Katraj Chowk : साताऱ्याकडून कात्रज चौकात येणाऱ्या वाहतूकीला बंदी

पुणे-सातारा रस्त्याची (जुना कात्रज घाट रस्ता) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
Katraj Chowk
Katraj ChowkSakal
Summary

पुणे-सातारा रस्त्याची (जुना कात्रज घाट रस्ता) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

कात्रज - पुणे-सातारा रस्त्याची (जुना कात्रज घाट रस्ता) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली असून साताऱ्याकडून कात्रज चौकामार्गे पुणे शहरात येणाऱ्या वाहतूकीला बंदी करण्यात आली. याबबातचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सदर रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून सातारा ते पुणे ही वाहतूक जुन्या कात्रज घाटातून न करता त्यावरील वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूलामार्गे पुण्याकडे वळविण्यात आल्याची माहिती सदर आदेशान्वये देण्यात आली आहे. सदरचा आदेश ३ डिसेंबर २०२२पासून ३१ डिसेंबर २०२२पर्यंत लागू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कात्रज घाट रस्त्यांवर दुहेरी वाहतूक चालू असताना डांबरीकरणाचे काम करणे जिकीरीचे होत होते. त्याचबरोबर, अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने आम्ही एकेरी वाहतूक करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही एकेरी वाहतूक करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देवेन मोरे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com