प्लॅस्टिकला पर्याय काय याबाबत लोकांमध्ये संभ्रम

मिलिंद संगई
शनिवार, 28 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : राज्यात सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक बंदीचे स्वागत झाले असले तरी अनेक पातळ्यांवर आता प्लॅस्टिकला पर्याय काय याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

बारामती (पुणे) : राज्यात सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक बंदीचे स्वागत झाले असले तरी अनेक पातळ्यांवर आता प्लॅस्टिकला पर्याय काय याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

बहुसंख्य व्यापारी व विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीने कॅरिबॅगपासून ते प्रतिबंधित प्लॅस्टिक उत्पादने विक्री व वाहतूकही थांबविली आहे. हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असल्याबाबत कोणाचेच दुमत नाही, मात्र प्लॅस्टिकला नेमका पर्याय काय द्यायचा याचा यक्ष प्रश्न दुकानदारांपुढे आहे.
 
काही स्तरांवर कागदी व कापडी पिशव्यांचा पर्याय निर्माण झाला असून अनेकांनी त्याचा वापरही सुरु केलेला आहे, मात्र अनेक वस्तू व उत्पादनांसाठी प्लॅस्टिक रॅपरसह वेष्टनाला काय पर्याय द्यायचा हे अनेकांना समजत नाही. 

कॅरिबॅग नाकारल्यावर लोक वस्तू घेण्याचा बेतच रद्द करत असल्याने काही ठिकाणी व्यावसायिक नुकसानही होत असल्याचे काही व्यापा-यांनी सांगितले. त्या मुळे नगरपालिका स्तरावर अशा बाबींसाठी नेमका पर्याय काय द्यायचा या बाबतही मार्गदर्शनाची आता व्यापा-यांची मागणी आहे. 

प्लॅस्टिक बंदी स्वागतार्ह असली तरी अनेक उत्पादनांच्या बाबतीत अनेक स्तरावर वर्षानुवर्षे वापरात असलेल्या प्लॅस्टिकला पर्याय काय द्यायचा या बाबत स्पष्टता नाही. त्या मुळे येणा-या अडचणींबाबत आता नव्याने काही निर्णय घेण्याची मागणी होते आहे. बंदी मान्य आहे मात्र किमान पर्याय तरी उपलब्ध व्हावेत अशी व्यापा-यांची मागणी आहे. 

 

Web Title: ban on plastic but what is option to citizens confused citizens