अनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी

अनिल सावळे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य सरकारच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.'' असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

शेट्टी म्हणाले, ''राज्य सरकारने दूध उत्पादक संघांना दूध खरेदीसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या अनुदानाची रक्कम दूध संघांना देण्यात आली. परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील अनुदानाची रक्कम दूध संघांना दिली नाही. राज्य सरकारकडे अनुदानापोटी सव्वादोनशे कोटी रुपये थकीत आहेत. यासंदर्भात दुग्धविकास मंत्र्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी. सरकारकडे अनुदानासाठी पैसे आहेत. परंतु दूध संघांकडून आवश्यक माहिती मिळत नाही, त्यामुळे अनुदान देण्यास उशिर होत आहे.'' सरकारकडे मागणी करूनही प्रतिसाद देत नसल्याचे दूध संघांचे म्हणणे आहे. मात्र, सरकार दूध संघांना अनुदान देण्याबाबत चालढकल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेट्टी म्हणाले, ''प्लॅस्टिक पिशवीतून दूध विक्री करण्यास पर्यावरण विभागाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक संघ अडचणीत येणार असून, त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसेल. तसेच, दुधाचे दर वाढतील. सरकारने अगोदर वेफर्स आणि गुटखा पाऊचवर बंदी घालावी. त्यानंतर दुधाच्या पिशवीचा विचार करावा.''

Web Title: ban on wafers and gutkha fist: said Raju Shetty