यवतमध्ये बाजारपेठेत कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

यवत - येथे आज मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. यवत येथे सोमवारी रात्री उशिरा येथील काही कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन ‘बंद’चा निर्णय घेतला. त्यामुळे आज सकाळपासून बाजारपेठ उघडलीच नाही. बॅंका, शाळा व इतर सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता संपूर्ण व्यवहार बंद होते. गावाच्या मुख्य पेठेतील रस्ता बांबूच्या साह्याने बंद करून त्यावर ‘यवत बंद’ फलक लावला होता. दर्शनी भागात भगवे झेंडेही लावण्यात आले होते. 

तलाठी कार्यालय, सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखा, पाटबंधारे कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक व माध्यमिक शाळा मात्र नियमितपणे सुरू होत्या. 

‘गाव बंद’बाबतचे निवेदन मराठा मोर्चाचे कार्यकर्ते सदानंद दोरगे, हेमंत दोरगे यांनी यवत पोलिसांना दिले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम उपस्थित होते. काकासाहेब शिंदे या तरुणाच्या बलिदानाबद्दल कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला.

टायर जाळण्याच्या जुजबी घटनांचा अपवाद सोडता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यवत पोलिस परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Band in yavat