‘बंडगार्डन’चे दरवाजे ३ वर्षांनंतर बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

येरवडा - महापालिकेने बंडगार्डन बंधाऱ्याचे स्वयंचलित दरवाजे अखेर तीन वर्षांनंतर बंद केले आहेत. खराडी येथील पंपिंग स्टेशनला पाण्याची गरज असल्यास दरवाजे पुन्हा चालू केले जातील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या काळात हे दरवाजे बंदच केले नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात होता. 

महापालिकेने काही वर्षांपूर्वी या बंधाऱ्यातील गाळ वाहून जाण्यासाठी त्याला पाच ठिकाणी छेद दिले होते. त्यामुळे बंधाऱ्यातील गाळ वाहून जाण्यास मदत झाली होती. मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बोट क्‍लबच्या नौकाविहाराला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे बोट क्‍लबने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धरणातील पाण्याची पातळी पूर्ववत करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

त्यानुसार महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून स्वयंचलित दरवाजे बसवले. त्यामुळे पावसाळ्यात नदीकाठावर असणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरण्याचे बंद झाले. बंधाऱ्यावरील दरवाजे नियंत्रण जलसंपदाच्या यांत्रिक विभागाकडे असले, तरी महापालिकेच्या मागणीप्रमाणे हे दरवाजे उघडले किंवा बंद केले जाऊ शकतात.

सांडपाण्यामुळे दुर्गंधी
शहरातील सांडपाणी थेट मुळा-मुठा नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीत पाण्याऐवजी सांडपाणीच जास्त दिसते. याचा परिणाम बंडगार्डन बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला असून, त्याची दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे बंडगार्डन बंधाऱ्याचे दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात.

बंडगार्डन बंधाऱ्यावरील स्वयंचलित दरवाजे हे गरजेप्रमाणे नियमितपणे बंद किंवा सुरू केले जाणार आहेत. खराडी येथील पंपिंग स्टेशनला पाण्याची गरज असल्यास पुन्हा बंडगार्डन दरवाजे उघडले जातील.
- श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता, प्रकल्प

Web Title: Bandgarden Dam Door Close

टॅग्स