esakal | Balewadi बाणेर बालेवाडी परिसरातील सर्व मंदिरे खुली
sakal

बोलून बातमी शोधा

 बालेवाडी भैरवनाथ मंदिर

बालेवाडी : बाणेर बालेवाडी परिसरातील सर्व मंदिरे खुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून ता. सात रोजी उघडण्यात आली. त्याचबरोबर या दिवशीच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असल्यामुळे बाणेर बालेवाडी परिसरातील अनेक मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापना ही करण्यात आली.

हेही वाचा: सहकारनगर : तळजाई टेकडीवरील तळजाई माता मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले

विठ्ठल रुक्मिणी मंदिर

विठ्ठल रुक्मिणी मंदिर

बाणेर बालेवाडी परिसरामध्ये

सकाळी सहा पासूनच मंदिर भक्तांसाठी खुली करण्यात आली. यासाठी आदल्या दिवशीच मंदिराची स्वच्छता करून घेण्यात आली.त्याचबरोबर मास्क असलेल्या नागरिकांनाच दर्शन देण्यात येईल असेही बालेवाडी विठ्ठल मंदिरातले पुजारी संतोष वाघमारे यांनी सांगितले. घटस्थापनेच्या मुहूर्तावरच मंदिर खुली झाल्यामुळे बालेवाडी भैरवनाथ मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वाघजाई मंदिर तर बाणेर येथील भैरवनाथ, तुकाई माता, राममंदिर येथे भक्त जणांनी दर्शनाचा लाभ घेतला.

loading image
go to top