पुण्यातील 'हा' भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

baner.jpg
baner.jpg

बालेवाडी (पुणे) : पुणे शहर आणि परिसरात रुग्णांची संख्या वाढत असून  बाणेर बालेवाडी याठिकाणी अगदीच कमी रुग्ण असल्याने हा विभाग ग्रीन झोन होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण एक जुलैपासून या भागातही कोरोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली असून बाणेर गावठाण व परिसर पुणे महापालिकेकडून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुणे परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुन्हा लॉकडाउनला सुरुवात केली असून, या लॉकडाउन च्या दुसऱ्या दिवशी बाणेर येथील रुग्णांची संख्या तीन पेक्षा जास्त झाल्यामुळे बाणेर गावठाण व परिसर हा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर बालेवाडी भागांमध्ये एक जुलैपर्यंत अगदीच कमी रुग्णसंख्या होती.  या भागांमध्ये अगदीच कुठेतरी एखादा रुग्ण आढळून येत होता. पण आता  एक जुलै नंतर येथे तीन पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग पुणे महापालिकेकडून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अनुषंगाने या भागात औंध बाणेर सहाय्यक आयुक्त  कार्यालयाकडून पाहणी सुरू असून आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी  माहिती घेत आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच इतर काही आजार असणाऱ्या नागरिकांची ही माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर त्यांना काही त्रास जाणवतो आहे का?  याची विचारणाही सुरू आहे.

आवश्यक वाटल्यास लगेच कोरोनाची टेस्ट ही करून घेतली जात आहे. बाणेर गावठाण हे  संपूर्ण सील न करता ज्या भागात जास्त रुग्ण आहेत तेथेच सील केले जाणार आहे.  अशी माहिती औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पवार यांनी दिली.    या भागातील सर्वच नगरसेवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना न घाबरता,  काळजी घ्या आणि घरातच रहा असा सल्ला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com