बाणेर, पाषाण परिसराला गुरुवारी पाणीपुरवठा नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीभवन आणि चांदणी चौकांपर्यंतच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (ता.२७) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (२८ डिसें.) सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसर, डावी-उजवी भुसारी कॉलनी, भूगाव, बावधन, परमहंसनगर, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, तेजसनगर, हिंगणे होम कॉलनी, काकडे सिटी, तिरुपतीनगर स्वेदगंगा सोसायटी, मुंबई-पुणे बायपासच्या दोन्ही बाजू, रेणुकानगर, हिलव्ह्यू सोसायटी, सोबापूरम, गार्डन फ्लोरा, बीएसयूपी सोसायटी, राहुलनगर, गोकुळनगर, वारजे माळवाडीचा परिसर, एनडीए रस्त्याकडील काही भाग रामनगर पंपिंगवरील काही परिसर.

Web Title: Baner Pashan area does not have water supply on Thursday