बाणेर रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ला विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पुणे - बाणेर रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. तशातच आता वाहतूक विभागाच्या वतीने या मार्गावर ’नो पार्किंग झोन’चा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यास नागरिकांचा विरोध होत आहे.

पुणे - बाणेर रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. तशातच आता वाहतूक विभागाच्या वतीने या मार्गावर ’नो पार्किंग झोन’चा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यास नागरिकांचा विरोध होत आहे.

बाणेर रस्त्यावर मेट्रोचा प्रकल्प साकारणार असल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. याचा विचार करून वाहतूक विभागाच्या वतीने या मार्गावर ’नो पार्किंग झोन’चा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु या मार्गावर अनेक दवाखाने, बॅंका, व्यावसायिकांची दुकाने, एटीएम केंद्रे, औषधी दुकाने असल्याने या सर्वांसह काही संघटनांनी या केल्या जाणाऱ्या बदलास विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या वतीने नुकतेच चतुःशृंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळकर यांना निवेदन देऊन नो पार्किंगऐवजी सम- विषम तारखेप्रमाणे 
पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अशा मागणी केली. 

त्यामुळे या मार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही व नागरिकांचीही पार्किंगची गैरसोय होणार नाही याची कल्पना दिली. या मार्गावर पूर्णपणे पार्किंगला बंदी केली तर या परिसरातील सर्व संघटनांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या मार्गावर विविध व्यावसायिकांनी मोठा खर्च करून दुकाने उभी केलेली आहेत. ग्राहकांना जर पार्किंगची सुविधा नसेल तर येथे कोणी येणार नाहीत. परिणामी, दुकानदारांसह नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यावर उपाय म्हणून बाणेर रस्त्यावरील यशदा ते महामार्गापर्यंत ज्या ज्या ठिकाणी पालिकेच्या ताब्यातील ॲमेनिटी स्पेस आहेत, त्या ठिकाणी पार्किंगची सोय केली तर या मार्गावरील पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले आहे.

Web Title: Baner Road No Parking Zone Oppose