बांगलादेशी नागरिकांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

बारामती - तालुक्‍यातील बुद्ध विहारातून अटक केलेल्या १९ बांगलादेशींना आज येथील न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

बांगलादेशी नागरिक असूनही भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ बांगलादेशींना तालुक्‍यातील माळेगाव व वडगाव निंबाळकर परिसरातून जिल्हा दहशतवादविरोधी पथकाने व स्थानिक पोलिसांनी शनिवारी त्यांना अटक केली. त्यांना आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. जी. महादेव कोळी यांच्यापुढे हजर करण्यात आले. तपासी अधिकाऱ्यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी या सर्वांना २९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

या बांगलादेशींकडे बांगलादेशचा पासपोर्ट असताना त्यांनी बनावट कागदपत्रे जमवून स्थानिक ग्रामपंचायतींच्या मदतीने भारतीय पासपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशचा पासपोर्ट असताना त्यांना भारतीय पासपोर्ट का हवा होता, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच या कामात त्यांना नेमके कोणी मदत केली, का केली, याचाही तपास दहशतवादविरोधी पथक व पुणे ग्रामीण पोलिस संयुक्तपणे करणार आहेत. या चौकशीमुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Bangladeshi citizens to police custody till tomorrow