सायबर गुन्हेगारांची बॅंक खाती गोठविली

सायबर गुन्हेगारांची बॅंक खाती गोठविली

पुणे ः ऑनलाइन खरेदी-विक्री व आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या देशभरातील सायबर गुन्हेगारांची सहाशेहून अधिक बॅंक खाती गोठवतानाच फसवणूक करणारे एक हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी शोधून बंद केले आहेत. 

वेगवेगळी खरेदी-विक्री संकेतस्थळे, विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करणारे मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याच्या प्रकारात गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. सायबर पोलिसांना सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्यास मर्यादा येत असल्याने गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य करण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. 

पोलिसांनी आठ महिन्यांतील तक्रारींचा बारकाईने अभ्यास केला. त्यामध्ये "ओएलएक्‍स'वरून वाहने, मोबाईल, फर्निचर व अन्य प्रकारच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या बहाण्याने लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार पुढे आले. पोलिसांनी तक्रारींमध्ये नमूद केलेले मोबाईल क्रमांक व बॅंक खात्यांची पाहणी केली. त्यामध्ये एक हजाराहून अधिक मोबाईल क्रमांकांचा व सहाशेहून अधिक बॅंक खात्यांचा फसवणुकीसाठी वापर केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार संबंधित मोबाईल कंपन्या व बॅंकांकडे पाठपुरावा करून पोलिसांनी संबंधित क्रमांक व खाती बंद केली. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आठ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे घडले. या तक्रारींचा बारकाईने अभ्यास करून कारवाई केली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत फसवणुकीच्या घटना निम्म्याने कमी झाल्याची चिन्हे आहेत. 
-संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com