बँक ऑफ बडोदा ठरली दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे : एप्रिल 1, 2019 पासून, बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू होणार असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018 च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च 30, 2019 ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा एप्रिल 1, 2019 पासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.

Web Title: Bank of Baroda become the second largest public sector bank