महाराष्ट्र बॅंकेच्या लॉकरमधून दहा कोटींच्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुण्यातील पर्वती शाखेत प्राप्तिकर विभागाची कारवाई
पुणे - महाराष्ट्र बॅंकेच्या पर्वती गाव शाखेमध्ये असलेल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या "लॉकर'मधून दहा लाख रुपयांच्या नव्या व जुन्या नोटा असल्याचे बुधवारी उघड झाले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगून सायंकाळी घातलेल्या छाप्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. बाहेरील कोणत्याही व्यक्तींशी कोणताही संपर्क करू नये, अशा सक्त सूचना प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.

महाराष्ट्र बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्र बॅंकेच्या या शाखेमध्ये पुरोहित नावाच्या व्यक्तीचे खाते अनेक वर्षांपासून आहे. त्यांची कंपनी असून त्याच्या "लॉकर'मधून ही रक्कम प्राप्तिकर विभागाला मिळाली आहे. ही माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कशी मिळाली, याबाबत आम्हालाही कल्पना नाही. रक्कम लॉकरमध्ये ठेवण्यात आल्यामुळे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही त्याबाबत काहीच पूर्वकल्पना नव्हती.''

'प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सायंकाळी बॅंकेच्या शाखेत जाऊन थेट लॉकरची तपासणी करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे त्या क्षणापासून शाखेतील कर्मचाऱ्यांना बाहेरील व्यक्तींशी संपर्क करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. नोटांची मोजणी सुरू झाल्यावर बॅंकेच्या अन्य अधिकाऱ्यांनाही त्याबाबत कोणती माहिती देण्यात येत नव्हती. प्राप्तिकर अधिकारी प्रसारमाध्यमांशी बोलल्यानंतर जी माहिती पुढे आली तेवढीच बाहेर येत होती,'' असेही बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्र बॅंकेच्या या शाखेत 15 लॉकर्स आहेत. या ठिकाणी दोन हजार रुपयांच्या नोटा असल्याची माहिती आम्हाला दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी सुरू केली. प्राप्तिकर विभागाने या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. या कंपनीने एवढी मोठी रक्‍कम कशी आणली, त्या ठिकाणी कशी ठेवली आदी बाबींची तपासणी सुरू करण्यात आली आहे.''

थेरगावात पाच जणांकडून 67 लाख जप्त
पिंपरी - गस्तीवरील पोलिसांनी थेरगाव येथे एका वाहनातील 67 लाखांची रोकड आणि पाच जणांना ताब्यात घेतले आहे. वाहनातील रक्कम नेमकी कोणाची? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी सुरू केली आहे. थेरगाव येथील एका सोसायटीजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
प्रवीण देविचंद जैन (रा. रविवार पेठ, पुणे), सराफाकडील कामगार चेतन ज्ञाताराम राजपूत (वय 24), साईनाथ विठ्ठल नेटके (वय 25, रा. सांगवी), अंकित सुदेश दोषी (वय 42, रा. अंधेरी, मुंबई) आणि राजीव इंदरमल गांधी (वय 26, रविवार पेठ, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना एका सोसायटीबाहेर रस्त्यावर एक मोटार (एमएच 02 सीटी 9097) उभी दिसली. संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता वाहनामध्ये पाच जण आणि एक बॅग असल्याचे आढळून आले. बॅग उघडली असता आतमध्ये 67 लाखांची रोकड मिळाली. यामध्ये शंभर आणि दोन हजाराच्या नोटा होत्या.

Web Title: Bank of Maharashtra locker seized 10 million