Coronavirus : बँक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी; बँक्स फेडरेशनचे आरोग्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांना पत्र!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कर्मचारी हे ग्राहकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे बॅंकेच्या खर्चाने त्यांची तपासणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्याबाबत उपाययोजना कराव्यात.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांमधील कर्मचाऱ्यांची जागेवर वैद्यकीय चाचणी करण्यात यावी. वैद्यकीय तपासणी बँकेकडून स्वखर्चाने करण्यात येईल, अशी मागणी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव बँक्स फेडरेशनने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्यावश्यक सेवांमधील अनेक कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामध्ये बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. कर्मचारी हे ग्राहकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे बॅंकेच्या खर्चाने त्यांची तपासणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्याबाबत उपाययोजना कराव्यात.

- फेसबुकची जिओमध्ये 43 हजार कोटींची गुंतवणूक

तसेच, बॅंकेच्या खर्चाने त्यांची कार्यालय आणि शाखांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कंत्राटदारांची नावे निश्चित करणेबाबत विचार व्हावा, असे फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रात नमूद केले आहे. 

- सर्वात मोठी ब्रेकिंग - मुंबईत १५ मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाण्याची भीती

दरम्यान, अनास्कर यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनाही पत्र लिहिले आहे. त्यात सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची जागेवर आरोग्य तपासणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

- डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना दणका; अजामीनपात्र गुन्हा आणि दोन लाखांपर्यंत दंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks Federation demanded for health check up of Bank employees to Health Minister