फलकबाजीविरोधात भाजपही सरसावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे - नोटाबंदीवरून नागरिकांना होत असणाऱ्या त्रासावरून भाजपला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांचा सामना करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोचवण्याची विशेष मोहीम उघडून भाजपने खास माहिती पत्रके तयार करून त्याचे वाटप करण्यास सुरवात केली आहे.

नोटाबंदीमुळे बॅंकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या असून, सर्वसामान्यांचे किरकोळ व्यवहार थंडावले आहेत. या संधीचा फायदा उठवत भाजपविरोधकांनी शहरात ठिकठिकाणी "जगी सर्व सुखी असा कोण आहे, मोदी कृपेने अदानी, अंबानी..' अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. या फलकांवर कारवाई करण्याची मागणी करतानाच हा निर्णय कसा योग्य आहे, असे फलकही आता ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. या बॅनरयुद्धासोबत भाजपने लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी काही माहिती पत्रके तयार केली आहेत.

शासकीय जीआर तारखेनुसार एकत्रित करून त्याची विस्तृत माहिती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकाच्या हजारो प्रती शहरात वाटण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महेश लडकत यांनी दिली. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोचवण्यात येत आहे.

बॅंकेत खाते नसणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातून संबंधित खातेदाराच्या लेखी संमतीने रद्द केलेल्या नोटा बदलून घेऊ शकतात. आपल्या प्रतिनिधीलाही आपला लेखी आदेश व आपले अधिकार पत्र देऊन नोटा बदलता येतात. एटीएममधून आठवड्याला 24 हजार रुपये, तर चालू खात्याच्या एटीएममधून 50 हजारांपर्यंत रक्कम काढता येते, अशी विस्तृत माहिती या पत्रकाद्वारे दिली आहे. या फलकबाजीला "आप'नेही जोरदार आक्षेप घेतला आहे.

Web Title: banner oppose BJP convention