हडपसरमध्ये 40 लाखांचे गाढव विकणे आहे; बॅनर झळकले!

hadapsar
hadapsar

पुणे : हडपसर परिसरात लागलेल्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे या बॅनरची सध्या जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहे.  

या बॅनरविषयी सविस्तर वृत्त असे, की हडपसर भागात ४० लाखांचे गाढव विकणे आहे अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गंमत म्हणजे यात गाढव म्हणजे प्रत्यक्ष गाढव प्राणी नसून 'रेल्वेचे गेट' आहे. शहरातील मुख्य उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसरमधील ससाणेनगर-सैय्यदनगर येथे वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेले रेल्वे गेट एका वर्षात पाच वेळा बिघडल्याचे दिसून आले. लाखो रुपये खर्च करून बसवलेले हे गेटरुपी गाढव विकणे अशी पोस्टर लागली असून त्याची नागरिकही आवर्जून हे बॅनर बघत आहेत. 

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आमदार निधीतून हे गेट बसवले आहे. मात्र त्यात अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्याने नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे रेल्वे गेटवर अडकणारे सर्व त्रस्त नागरिक अशा नावाने हे बॅऩर लागले आहे. आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सुरु झालेली ही बॅनरबाजी चर्चेचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com