भुशीकडे जाणाऱ्या बसेस व अवजड वाहनांना विकेंडला बंदी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

लोणावळ्यात वीकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार आणि रविवारी भुशी धरण, लायन्स पाँईटकडे जाणाऱ्या मार्गावर बसेस व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

लोणावळा : लोणावळ्यात वीकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार आणि रविवारी भुशी धरण, लायन्स पाँईटकडे जाणाऱ्या मार्गावर बसेस व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. लोणावळा शहरचे  पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी ही माहिती दिली. 

लोणावळ्यात सध्या पावसाळी हंगाम जोमात आहे. लोणावळा, खंडाळ्यात वर्षाविहार व पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची ओसंडून गर्दी होत आहे. पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाहनांमुळे लायन्स पॉइंट, भुशी ते लोणावळा दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागत आहे. याचबरोबर पुणे-मुंबई महामार्ग व शहरातील अंतर्गत रस्तेही जाम होत आहेत. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना रस्त्याने चालणेही मुश्किल होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी भुशीकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहने, बसेस यांना शनिवार व रविवारी बंदी घालण्याचा निर्णय पोलिसांच्यावतीने घेण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bans on buses and heavy vehicles traveling to Bhusi on Weekend