#BappaMorya झगमगाटासाठी एलईडी माळा

Welcome to ganesh with LED Blaze
Welcome to ganesh with LED Blaze

पुणे : स्टार लाइट्‌सपासून ते कोल्हापुरी लाइट्‌सपर्यंत...मल्टीकलर लाइट्‌सपासून ते एलईडी डायमंड लाइट्‌सपर्यंत...अशा इलेक्‍ट्रॉनिक माळांच्या (लाइट्‌स) झगमगाटात घरोघरी बाप्पाचे स्वागत होणार आहे. घरगुती वा मंडळाच्या गणपती सजावटीसाठी यंदा विविधांगी इलेक्‍ट्रॉनिक माळा बाजारात आल्या आहेत. यात सर्वाधिक भाव खात आहेत त्या एलईडी माळा...विद्युत रोषणाईने गणेशोत्सवाचा रंग आणखी बहरावा, यासाठी इलेक्‍ट्रॉनिक बाजारात विविध प्रकारच्या रंगबिरंगी माळा आल्या आहेत. चिनी बनावटीबरोबरच भारतीय पद्धतीच्या एलईडी माळांनाही मागणी आहे. त्यामुळे विद्युत रोषणाईच्या माळांनी या वर्षीचा गणेशोत्सव प्रकाशमान होणार आहे. 

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी दरवर्षी इलेक्‍ट्रॉनिक माळांना मागणी असते. चिनी बनावटीच्या माळांसह यंदा भारतीय पद्धतीच्या माळांनीही बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या सर्व माळा एलईडी प्रकारातील असून, घरगुती गणपतींसह मंडळांकडूनही इलेक्‍ट्रॉनिक माळांना चांगली मागणी आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी 25 ते 30 फूट, तर मंडळांच्या डेकोरेशनसाठी 80 ते 110 फुटांच्या इलेक्‍ट्रॉनिक माळांची मागणी आहे. आपल्याला हव्या त्या रंगांमध्ये या माळा खरेदीसाठी उपलब्ध आहेत. चिनी बनावटीच्या माळांना घरगुती गणपतीसाठी अधिक मागणी असून, भारतीय पद्धतीच्या माळांची मागणी मंडळांकडून होत आहे. दोन्ही प्रकारच्या माळांची किंमत 150 ते 1200 रुपयांपर्यंत आहे. 

याबाबत व्यावसायिक हितेश ओसवाल म्हणाले, ""दोन्ही प्रकारच्या माळा या एलईडी प्रकारातील आहेत. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी छोट्या चिनी माळा आणि मंडळांकडून भारतीय बनावटीच्या माळांना मागणी आहे. एका रंगाच्या आणि बहुविध रंगांच्या (मल्टिकलर) माळांना पसंती मिळत आहे. भारतीय पद्धतीच्या माळा पुणे आणि उल्हासनगर येथून तर चिनी पद्धतीच्या माळा या मुंबईवरून येतात. दरवर्षी सजावटीसाठी इलेक्‍ट्रॉनिक माळांना लोकांची पसंती मिळते. या माळांमध्ये नानाविध प्रकार दिसून येतील.'' 

फोकस लाइट्‌ला सर्वाधिक मागणी 

घरगुती गणपती आणि मंडळांच्या सजावटीसाठी यंदा एलईडी प्रकारातील फोकस लाइट्‌ला सर्वाधिक मागणी आहे. सिंगल कलर आणि मल्टिकलर लाइट्‌सची मागणी वाढली असून, झिरमिळ्यांसह फोकस लाइट्‌सही भाव खात आहे. यामध्ये विविध प्रकार दिसून येतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com