शिर्सुफळ सोसायटीच्या अध्यक्षपदी बापुराव गाढवे तर उपाध्यक्षपदी मनिषा पानसरे 

संतोष आटोळे 
बुधवार, 11 जुलै 2018

शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष पदी बापुराव काशिनाथ गाढवे तर उपाध्यक्षपदी मनिषा विलास पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष पदी बापुराव काशिनाथ गाढवे तर उपाध्यक्षपदी मनिषा विलास पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील सोसायटीचे अध्यक्ष दिलीप आटोळे व उपाध्यक्ष अनिल सातपुते यांनी स्थानिक पातळीवर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता.यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत अध्यक्ष पदासाठी बापुराव गाढवे व उपाध्यक्ष पदासाठी मनिषा पानसरे यांचेच अर्ज दाखल झाले. यामुळे त्याची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम.पी.राऊत यांनी जाहिर केले.यावेळी 13 संचालका पैकी दिलीप आटोळे, तानाजी आटोळे, विजय गोलांडे, दिपक आटोळे, नरसिंग आटोळे, संजय आटोळे, नरहरी सावंत, अनिल सातपुते, सविता बनकर हे संचालक उपस्थित होते. सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब आटोळे, साबळेवाडीचे माजी सरपंच सतिश गोलांडे यांच्यासह सभासदांनी प्रयत्न केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सचिव विलास पानसरे यांनी काम पाहिले. 

Web Title: Bapu Gadhve as President of Shirusfulal Society and Manisha Pansare as Vice President