बारामती नगरपालिकेने तयार केले 'स्वच्छतेचे ऍप'

file photo
file photo

बारामती (पुणे): शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनास त्वरेने माहिती मिळावी यासाठी नागरिकांनी स्वच्छतेबाबतच्या अँपचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य निरिक्षक रवींद्र सोनवणे, सुभाष नारखेडे व राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या अँपच्या माध्यमातून बारामती शहर अधिक स्वच्छ व सुंदर असावे या उद्देशाने आता नागरिकांच्या समस्या स्मार्ट फोन द्वारे नगरपालिका प्रशासनापर्यत पोहोचाव्यात हा या मागचा उद्देश आहे. Swachhata-MoHUA हे अँप स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड करुन घेतल्यास त्या द्वारे आपल्या परिसरातील किंवा शहरातील स्वच्छतेबाबतच्या सर्व तक्रारी यावर नागरिकांना सहजतेने छायाचित्रांसह अपलोड करता येणार आहेत.

नगरपालिकेचा आरोग्य विभाग रोजच्या रोज या अँपवर येणा-या तक्रारींच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवून स्वच्छतेची कामे करणार आहे. दररोज आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छतेचे काम घंटागाड्यांसह कंत्राटी मजूरांच्या सहाय्याने केले जातेच, मात्र तरीही काही ठिकाणी अस्वच्छता असल्यास आरोग्य विभाग त्या बाबत कार्यवाही करुन त्या कार्यवाहीची माहितीही या अँपवर अपलोड करणार आहे.

नागरिकांच्या सहकार्याची गरज शहरात निर्माण होणारा किंवा रस्त्यावर पडलेला कचरा हा कोणत्या तरी नागरिकानेच टाकलेला असतो, प्रत्येक नागरिकाने जर कचरा घंटागाडीमध्ये टाकेन असा निर्धार केला तर ही समस्या कमी होऊ शकेल असे आरोग्य विभागाचे मत आहे. कचरा टाकणार नाही आणि टाकू देणार नाही असा निर्धार बारामतीकरांनी केला तर बारामती राज्यातील सर्वाधिक सुंदर शहर चटकन होईल,
 असा विश्वास नगरपालिका प्रशासनाला वाटतो.

वर्गवारीचीही नितांत गरज
ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यास बारामतीकरांनी प्रारंभ करुन हा कचरा वेगवेगळा दिल्यास आरोग्य विभागाचेही काम सोपे होईल, प्लॅस्टिकचा कचरा वेगळा गोळा केल्यास त्याचाही शहराचे पर्यावरण संतुलित राखण्यास फायदा होईल, असेही आरोग्य विभागाचे मत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com