बारामतीत एकाच दिवशी 42 जण कोरोनाग्रस्त; एकूण बाधितांचा आकडा गेला 722 वर

मिलिंद संगई
Saturday, 29 August 2020

शहरात तपासण्यांची संख्या वाढू लागल्याने रुग्णसंख्याही वाढत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बारामती : शहरातील तपासण्यांची संख्या ज्या वेगाने वाढते आहे, त्याच वेगाने कोरोनाग्रस्तांचीही संख्या वाढू लागली आहे. काल एकाच दिवसात बारामतीत 42 कोरोनाग्रस्त आढळून आले तर एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनामृत्यूंची संख्या 31 वर गेली आहे. आज सकाळपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 722 इतकी झाली आहे. दरम्यान 389 जण आजवर बरे झालेले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात तपासण्यांची संख्या वाढू लागल्याने रुग्णसंख्याही वाढत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. काल 145 नमुने आरटीपीसीआरसाठी, शासकीय अँटीजेन तपासणीसाठी 33 तर खाजगी प्रयोगशाळेत 62 असे एकूण 240 नमुने तपासले गेले. या पैकी 170 नमुने निगेटीव्ह आले आहेत. या पैकी 26 जणांचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहे. जे 42 जण पॉझिटीव्ह आले आहेत त्यात बारामती शहरातील 30 तर ग्रामीण भागातील 12 जणांचा समावेश आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती शहरातील आमराई, जामदार रोड, सूर्यनगरी, तावरे बंगल्याशेजारी, इंदापूर रोड, रुई, श्रीरामनगर, श्री महावीर भवन, सातव वस्ती, कसबा, गिरीराज हॉस्टिपल, खंडोबानगर, खत्री पार्क, राम गल्ली, भिगवण रोड, हरिकृपानगर, तांबे नगर, पाटस रस्ता, सिध्दांत नगर येथील तर तालुक्यातील जळगाव कडेपठार, उंडवडी, पणदरे, अंजनगाव, नीरावागज, पिपंळी, माळेगाव बुद्रुक, सोनवडी सुपे, शिवनगर, गुनवडी येथील रुग्णांचा समावेश आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

शहरातील वाढती गर्दी हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. काही जणांनी स्वत:हून काही बंधने घालून घेतलेली असली तरी जे विनामास्क बिनधास्त शहरभर फिरतात त्यांच्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati 42 people were corona positive in a single day