Farmer Electricity Connection : बारामती परिमंडलाची आघाडी; दोन वर्षात दिल्यात ६२ हजार शेती वीज जोडण्या

महावितरण कंपनीच्या बारामती परिमंडलाने गेल्या दोन वर्षांत शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे.
Mahavitaran
Mahavitaransakal
Summary

महावितरण कंपनीच्या बारामती परिमंडलाने गेल्या दोन वर्षांत शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे.

बारामती - महावितरण कंपनीच्या बारामती परिमंडलाने गेल्या दोन वर्षांत शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. ३० मीटर अंतरातील प्रतिक्षा यादी जवळपास संपली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून कोटेशन भरावे. अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत कनेक्शन देण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.

‘कृषी धोरण-२०२०’

शेतीपंपाच्या जोडणीकरिता एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले. त्यानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली, त्यातील ३३ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’ गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध झाला. त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.

Mahavitaran
Bail Rejected : माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन चौथ्यांदा फेटाळला

शाखा कार्यालयात संपर्क साधावा

ज्या शेतकऱ्यांची ३० मीटर अंतरातील जोडणी प्रलंबित आहे किंवा ज्यांना नव्याने अर्ज करायचा असेल, त्यांनी नजीकच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नवीन जोडण्या देण्यात येतील, असे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सांगितले.

२४ वीज उपकेंद्रांचे काम प्रगतिपथावर

कृषी आकस्मिक निधीतून बारामती परिमंडलात सद्यःस्थितीत २४ वीज उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, उपकेंद्रातील अतिउच्चदाब रोहित्राची क्षमतावाढ केली आहे. परिणामी महावितरणची भार क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करणे व नवीन जोडण्या देणे शक्य झाले आहे.

Mahavitaran
Dnyandevi Pune Childline : पॉर्न अ‍ॅडिक्शनमुळे मुलांवरील दुष्परिणामांवर उपाय शोधणार

अंतरानुसार दिलेल्या जोडण्या

  • ३० मीटरच्या आतील - ५० हजार ३१३ जोडण्यांपैकी ५० हजार ८९ जोडण्या

  • ३१ ते २०० मीटर - १२ हजार १६० पैकी ९२६२

  • २०१ ते ६०० मीटर - ७५१० पैकी २३२४ जोडण्या

  • ६०० मीटरपेक्षा जास्त - ११९ शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे वीज जोडणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com