बारामती - विनाकारण टाईमपास करणा-या युवकांवर कारवाई

मिलिंद संगई
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बारामती शहर - शाळा महाविद्यालयांबाहेर विनाकारण टाईमपास करणा-या युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसात विद्या प्रतिष्ठान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, म.ए.सो. विद्यालयासह काही शाळांबाहेर पोलिसांनी जोरदार कारवाई केली. आकांक्षा दरेकर हिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सर्वच शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसता दुचाकी महाविद्यालयात तसेच शाळेत आणणे, एकाच वाहनावरुन तिघांनी जाणे, वेगाने गाडी चालविणे, या प्रकारांबद्दल पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. 

काही ठिकाणी रोडसाईड रोमिओंना पोलिसांचा चांगलाच प्रसादही मिळाला. दरम्यान काहीही काम नसताना शाळा महाविद्यालयांच्या परिसरात घुटमळणारे युवक पोलिसांच्या कारवाईच्या केंद्रस्थानी होते. अनेक युवकांच्या पालकांना पोलिसांनी बोलावून त्यांना योग्य ती समज देण्यात आली. 

मुलींनी थेट तक्रार करावी
ज्या मुलींना कोणतीही मुले कशाही स्वरुपात त्रास देत असतील त्यांनी पोलिसांकडे न घाबरता तक्रार करावी, महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा प्राध्यापकांकडेही या बाबत तक्रार केल्यास पोलिस या बाबत तातडीने कारवाई करतील, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. निर्भया व दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचा-यांकडेही मुली तक्रारी करु शकतात. 

मुलींकडेही पालकांचे लक्ष हवे...
अनेकदा मुली स्कार्फ बांधून दुचाकीवरुन जातात तेव्हा त्यांच्या पालकांनाही ही मुलगी आपली आहे हे ओळखू येत नाही. शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सहा अल्पवयीन मुलींना मुलांसोबत फिरताना पकडून पोलिस ठाण्यात आणले, तेव्हा पालकांनाही आपली मुलगी काय करते आहे याचा तपासच नव्हता हे सिध्द झाले. त्या मुळे मुलीही कोठे जातात, काय करतात, त्यांच्या मैत्रीणी कोण याची व्यवस्थित माहिती पालकांनी ठेवावी असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सीसीटीव्ही कॅमेरे अत्यावश्यक
सर्वच शैक्षणिक संकुलात फिरुन पोलिस सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, असतील तर ते व्यवस्थित आहेत का याचीही माहिती आता संकलित करीत आहेत. काही नवीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्याच्या सूचनाही पोलिस अधिका-यांनी केल्या आहेत. 

Web Title: Baramati - Action on Yong collage students