Baramati News : इतका गवगवा कशासाठी; अजित पवारांचा प्रश्न

पुण्यात बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले यांच्या ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला, ही चूक होती, त्या बद्दल अजित पवार यांनी लगेचच दिलगीरीही व्यक्त केली.
Ajit pawar
Ajit pawar Sakal

बारामती - आपल्या परखड शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामतीत माध्यमांशी बोलताना चुकून झालेल्या विधानाचा बाऊ केल्याबद्दल मुद्दा उपस्थित केला.

पुण्यात बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले यांच्या ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला, ही चूक होती, त्या बद्दल मी लगेचच दिलगीरीही व्यक्त केली. मात्र त्याचा इतका गवगवा करण्याची गरज नव्हती, असे अजित पवार म्हणाले.

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांची एकदिवसांची कार्यशाळा बारामतीत आयोजित करणार असल्याचे सांगत, या निमित्ताने त्यांनाही आपल्या कामाबद्दल सविस्तर माहिती मिळेल, असे ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणूकीनंतर अजित पवार प्रथमच बारामतीत आले होते त्या मुळे त्यांना भेटायला सरपंच व सदस्यांनी आज मोठी गर्दी केली होती.

नवीन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. नवीन लोकांच्या हातात गावचा कारभार गेला पाहिजे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे चांगले निकाल लागले. तालुक्यात दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतात. परंतु गटातटात आम्ही पडत नाही. जो गट निवडून येईल त्यांना मदत करायची गावच्या विकासाला हातभार लावायचा ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण मी पुढे घेवून जात असल्याचे ते म्हणाले.

अजित पवारांसाठी मोठा बंदोबस्त

अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर तसेच शहरात झालेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, कोणताही धोका पत्करायचा नाही,असा निर्णय घेतलेला असल्याने आज अजित पवार सुरक्षा यंत्रणांच्या गराडयात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com