esakal | बारामतीत कोरोनाची साखळी तुटता तुटेना! बाधिताचां आकडा पोचला..
sakal

बोलून बातमी शोधा

In Baramati another 13 people were infected with corona

बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरातील तीन तर प्रगतीनगरमधील दोघांना एकाच वेळेस कोरोनाची लागण झाली आहे. या शिवाय रुई, खाटिक गल्ली येथील रुग्णांचाही समावेश आहे.

बारामतीत कोरोनाची साखळी तुटता तुटेना! बाधिताचां आकडा पोचला..

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोनाची साखळी तूटत नसल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. ही साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनासह नागरिकांनीही सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजही बारामती शहर व तालुक्यात 13 रुग्णांची भर पडल्याने बारामतीच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 188 पर्यंत गेली असून मृतांचा आकडा 15 पर्यंत पोहोचला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरातील तीन तर प्रगतीनगरमधील दोघांना एकाच वेळेस कोरोनाची लागण झाली आहे. या शिवाय रुई, खाटिक गल्ली येथील रुग्णांचाही समावेश आहे. तालुक्यातील जळगाव सुपे, को-हाळे बुद्रुक, माळेगाव, गुनवडी, ब-हाणपूर येथील 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान काल 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्या पैकी 13 अहवाल अजून प्राप्त व्हायचे असल्याने आजचा आकडा आणखी वाढेल की काय अशी भीती व्यक्त होत आहे. 

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

दरम्यान रुग्णांची संख्या वाढत राहिली तर बारामतीत आरोग्य सुविधांची कोणतीही कमतरता भासू नये या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने आता तयारी सुरु झाली आहे. वसतिगृहांसह इतरही जागा आयसोलेशनच्या दृष्टीने निश्चित करण्याचे काम सुरु झाले आहे. यंत्रणेत समन्वय राहण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. 

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

गेल्या दहा दिवसात बारामतीत रुग्णांची संख्या नियमितपणे वाढत असून ही वाढणारी संख्या बारामतीकरांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. बारामतीतील दैनंदिन व्यवहार संध्याकाळी पाच पर्यंत नियमितपणे सुरु आहे, लोकांची अनेक ठिकाणी गर्दी होत आहे, अनेकदा ट्रॅफिक जॅमचाही अनुभव बारामतीच्या रस्त्यावर येत असून गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे.