#mynewspapervendor बारामतीत वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा

मिलिंद संगई
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

बारामती -  वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज विक्रेता दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा होत आहे. त्या निमित्त सकाळ समूहाने वृत्तपत्र विक्रेत्यांना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर ओळख निर्माण करुन दिली आहे. आज बारामतीतही वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विक्रेत्यांनी घोषणा देत आपल्या एकीचे दर्शन घडविले. विक्रेता दिनानिमित्त विक्रेत्यांनी पेढे वाटपही केले. 

संघटनेचे अध्यक्ष विजय सणस, उपाध्यक्ष फैय्याज शेख, सचिव अप्पा घुमटकर, बापू गायकवाड, शाम राऊत, संतराम घुमटकर, प्रकाश शिंदे, राजेंद्र हगवणे, पांडुरंग हगवणे, बाळासाहेब पायगुडे, कांतीलाल बोरकर, प्रकाश उबाळे, माधव झगडे, केशव झगडे, प्रभाकर लांडगे, मच्छिंद्र सायकर, रमेश दुधाळ, किशोर शिंदे, भोलेनाथ धाईंजे, बशीर बागवान, प्रिन्स घाडगे, पप्पू घाडगे, युवराज घुमटकर, सचिन सणस, सुनील वाघमारे, फिरोज अली, रमेश शिंदे, श्रावण भंडारी, गणेश शिर्के आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

दखल घेतल्याचे समाधान
घरोघरी जाऊन वर्षभर ग्राहकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविणा-या वृत्तपत्र विक्रेत्यांची दखल सकाळ माध्यम समूहाने घेतली, याचे समाधान आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी याच प्रकारे भविष्यातही सकाळ समूह कार्यरत राहिल, अशी अपेक्षा आहे- विजय सणस, अध्यक्ष बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना.

Web Title: Baramati celebrates the newspaper seller day in Baramati