#SSCResults : दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 84.35 टक्के निकाल

results.jpg
results.jpg

बारामती शहर : इयत्ता दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 84.35 टक्के निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. 

बारामती केंद्रावर 6889  विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते त्या पैकी 5811   विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. बारामती केंद्रावरील 73  शाळांमधील 3628 मुले व 3261  मुलींनी ही परिक्षा दिली. त्या पैकी 2909 मुले तर 2902 मुली उत्तीर्ण झाल्या. या मध्ये मुलांच्या निकालाची 80.18 टक्केवारी इतकी तर मुलींच्या निकालाची टक्केवारी 88.99 टक्के इतकी आहे.
 
यंदा तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर,   शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, विद्या प्रतिष्ठान मराठी मिडीयम हायस्कूल, ऊर्दू माध्यमिक विद्यालय, , जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय,  विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, सोमेश्वरनगर,  विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदीर, पिंपळी, सह्याद्री पब्लिक स्कूल, खंडोबाचीवाडी,  सिध्देश्वर पब्लिक स्कूल, को-हाळे बुद्रुक, राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल, खंडुखैरेवाडी, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, प्रगतीनगर, सोमेश्वर पब्लिक स्कूल, शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल, संत सावतामाळी प्रायमरी स्कूल या  शाळांचा निकाल शंभर टक्के जाहीर झाला आहे.

इतर शाळांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे-
म.ए.सो. विद्यालय-86.77, एस.एस.एम. विद्यालय, माळेगाव- 72.34, श्री छत्रपती शाहू हायस्कूल- 70.97, मिशन हायस्कूल- 53.57, स्वातंत्र्य विद्या मंदीर, वडगाव निंबाळकर- 75.49, वसतिगृह विद्यालय, का-हाटी- 89.10, नवमहाराष्ट्र विद्यालय, पणदरे- 90.28, श्री शहाजी हायस्कूल, सुपे- 86.14, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सांगवी- 81.81, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी- 87.62, मयूरेश्वर विद्यालय, मोरगाव- 83.44, न्यू इंग्लिश स्कूल, डोर्लेवाडी- 82.35, श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय, उंडवडी- 91.78,  आर.एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट, बारामती- 85.17, न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी- 81.29, श्री सिध्देश्वर हायस्कूल, को-हाळे बुद्रुक- 83.63, न्यू इंग्लिश स्कूल, कारखेल- 75, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- 82.51, शारदाबाई पवार विद्यालय, शिवनगर- 83.49, आनंद विद्यालय, होळ- 52.45, न्यू इंग्लिश स्कूल, लोणीभापकर- 80, श्री शिरसाई विद्यालय, शिर्सुफळ- 76.92, सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव- 90.32, श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय, भिकोबानगर- 93.75, न्यू इंग्लिश स्कूल, लाटे- 79.71, वाघेश्वरी विद्यालय, नीरावागज- 66.66, न्यू इंग्लिश स्कूल, चोपडज- 80.85, श्री छत्रपती हायस्कूल, सोनगाव- 89.47, कै. जिजाबा गावडे विद्यालय, पारवडी- 92.15, श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विदयालय, पिंपळी- 82.85, न्यू इंग्लिश स्कूल, मेखळी- 86.66, वसंतराव पवार विद्यालय, देऊळगाव रसाळ- 91.48, माध्यमिक विद्यालय, करंजे, सोरटेवाडी- 84.21, श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय, कांबळेश्वर, पणदरे- 88.88, धों.आ. सातव माध्यमिक विद्यालय- 72.41, सोमेश्वर विद्यालय, आंबी बुद्रुक- 79.16, सोमेश्वर विद्यालय, मुढाळे- 61.53, श्री छत्रपती हायस्कूल, काटेवाडी- 80.61, न्यू इंग्लिश स्कूल, गोजुबावी- 87.50, खांडेश्वर माध्यमिक विद्यालय, खांडज- 75, माध्यमिक विद्यालय, गडदरवाडी- 75, न्यू इंग्लिश स्कूल, नारोळी- 83.87, बी.एस.काकडे देशमुख विद्यालय, निंबूत- 88.23, श्री भैरवनाथ विद्यालय, बाबुर्डी- 90.90, श्री भैरवनाथ विद्यालय, को-हाळे खुर्द- 72.72, न्यू इंग्लिश स्कूल- ढाकाळे- 76.31, श्री छत्रपती हायस्कूल, निंबोडी- 75.86, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, मेडद- 66.66, शरदंचद्र पवार माध्यमिक विद्यालय, जळगाव- 81.81, कै. अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय, पळशी- 63.41, उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा, वाघळवाडी- 89.47, बाजीराव गावडे पाटील विद्यालय, गुनवडी- 16.66, इंग्लिश मिडीयम स्कूल, माळेगाव- 95.65, कवि मोरोपंत शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालय- 92.85, विजय बाल विकास मंदीर माध्यमिक विद्यालय, बांदलवाडी- 87.50, शारदा निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल- 93.75, सरस्वती माध्यमिक विद्यालय- 50.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com