Sharad Pawar
Sharad Pawaresakal

Baramati News : छत्रपती संभाजी महाराजांबाबतचा वाद निरर्थक - शरद पवार

बारामतीत आज माध्यमांशी बोलतांना अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या बाबतीतील वक्तव्यानंतर उदभवलेल्या वादावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ही भूमिका मांडली.
Summary

बारामतीत आज माध्यमांशी बोलतांना अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या बाबतीतील वक्तव्यानंतर उदभवलेल्या वादावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ही भूमिका मांडली.

बारामती - छत्रपती संभाजी महाराजांप्रती आस्था आहे अशा काही लोकांना ते धर्मवीर आहेत असे वाटले आणि काहींना ते स्वराज्यरक्षक आहेत असे वाटले तरी त्या वरुन वाद करण्याचे काही कारण नाही, या भूमीचे रक्षण करण्यासाठी संभाजी महाराजांनी प्राणांचे बलिदान केलेले आहे, त्या मुळे धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक या भूमिकांवरुन वाद करु नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली.

बारामतीत आज माध्यमांशी बोलतांना अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या बाबतीतील वक्तव्यानंतर उदभवलेल्या वादावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ही भूमिका मांडली. महाराजांचे या भूमीप्रती कार्य महत्वाचे आहे, इतर वाद करु नयेत असे ते म्हणाले.

महागाई, बेरोजगारी असे मुद्दे मागे पडत आहेत, ज्या मुळे लोक अस्वस्थ आहेत, अशा विषयाला बाजूला ठेवून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहेत. लव्हजिहाद प्रकरणी कायदे करण्याची मागणी होत आहे, पण कायदे करणार कोण....केंद्र व राज्यातही भाजपचेच सरकार आहे, कायदा करण्याची मागणी करण्यासाठी मोर्चे काढण्याची गरज काय आहे, सर्वांना विश्वासात घेऊन भाजपने कायदा करुन मोकळे व्हावे, असे ते म्हणाले.

नोटबंदीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, न्यायालयाने दिलेला निकाल आपल्याला मान्य करावा लागेल, इथून पुढच्या काळात त्याचे अर्थकारणावर झालेले परिणाम व वेगळी मते, नंतर पुढे येतील, असे ते म्हणाले.

भाजप अध्यक्षांना चिमटे...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात मिशन 45 ची घोषणा केली या वर विचारता पवार म्हणाले, मला खरतर आश्चर्य वाटल त्यांनी 48 ची घोषणा करायला हवी होती. त्यांच्या राज्यात निवडणूका झाल्या, सत्ता असूनही लोकांनी त्यांना सत्तेतून दूर केले. राज्याची केंद्राची सत्ता असताना ज्यांना निवडणूक जिंकता आली नाही, त्यांच्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यावी याचा विचार करण्याची आवश्यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com