बारामती शहर पोलिसांचा 'मेकओव्हर'

police-cap
police-cap

बारामती शहर - सध्या तुम्ही बारामती शहर पोलिस ठाण्य़ात गेला तर तुम्हाला गणवेशातील पोलिस एकदम कडक कपड्यात तर साध्या वेशातील पोलिसही चकाचक दिसतील. अचानकच हा बदल कसा काय झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न आज केला तेव्हा नव्या साहेबांनी कर्मचा-यांचा मेकओव्हर करण्याचा चंग बांधल्याचे समोर आले. 
पोलिस मग तो गणवेशातील असो किंवा साध्या वेशातील तो व्यवस्थितच असला पाहिजे, त्याचा योग्य रुबाब असायला हवा असा आग्रह नवीन पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी धरला आहे. 

सध्या शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी साध्या वेशात येतात तेव्हा व्यवस्थित शर्ट इन करुन येतात, त्यांचा बेल्ट व्यवस्थित असतो, केस व्यवस्थित असतात, पायात चप्पल नाही तर शूज असतात. गणवेशातील पोलिसांचाही गणवेश व्यवस्थित व बूटही चकाचक असतात. पाटील यांनी वैयक्तिक व परिसर स्वच्छता या दोन गोष्टींना महत्व दिले असून, कामाच्या तासांव्यतिरिक्त अवांतर वेळेचाही पोलिसांनी सदुपयोग करावा असा त्यांचा आग्रह आहे. 

आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर पडावी व पोलिसांबद्दलचा आदर द्विगुणित व्हावा असा या मागचा हेतू असल्याचे पोलिस कर्मचा-यांनी सांगितले. या माध्यमातून पोलिसांचे मनोधैर्य अधिक वृध्दींगत व्हावे आणि व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसावे, असा पाटील यांचा प्रयत्न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com