सुंदर व टुमदार शहराच्या दिशेने बारामतीची वाटचाल सुरु

स्वच्छ सर्वेक्षण अहवालात गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर आता मात्र बारामती नगरपालिकेने शहर सुंदर व सुशोभित करण्याची बाब मनावर घेतली आहे.
Fountain
FountainSakal
Summary

स्वच्छ सर्वेक्षण अहवालात गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर आता मात्र बारामती नगरपालिकेने शहर सुंदर व सुशोभित करण्याची बाब मनावर घेतली आहे.

बारामती - सुंदर व टुमदार शहराच्या (Beautiful City) दिशेने बारामतीची (Baramati) वेगाने वाटचाल (Journey) सुरु आहे. स्वच्छ सर्वेक्षण अहवालात गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर आता मात्र बारामती नगरपालिकेने शहर सुंदर व सुशोभित करण्याची बाब मनावर घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सुशोभिकरण जोमाने सुरु आहे.

शहराच्या अनेक चौकांमध्ये स्वच्छ व सुंदर बारामतीचे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत, सायकल ट्रॅक आखण्यात आले आहेत, काही ठिकाणी आय लव्ह बारामतीचे दिव्यांनी उजळून जाणारे फलक लावले गेले आहेत तर काही ठिकाणी भिंतींवर स्वच्छतेचे संदेश दिले जात आहेत. अनेक ठिकाणी कचरा टाकला जाईल अशा ठिकाणांना निवडून तेथे उपाययोजना केल्या जात असून अनेक ठिकाणी छोट्या स्टीलच्या कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. घंटागाड्यांची संख्या वाढली असून कचरा डेपोवरील कच-यावर प्रक्रीया करुन त्याचे बायोमायनिंग सुरु आहे.

बारामती नगरपालिकेने साठवण तलावामध्ये पाणी स्वच्छ राहावे, ऑक्सिजन निर्मिती व्हावी, शेवाळे होऊन पाण्याला वास येऊ नये या साठी तीस फूट उंचीचे कारंजे बसविले आहे. यावर रंगीत लाईट सोडण्यात आले आहेत. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत हे कारंजे तयार करण्यात आले आहे. साहिल खत्री, अक्षय सूर्यवंशी व रोहन कोकणे यांनी हे साकारले आहे. या शिवाय स्विमींग पूलनजिक लिली व पाम यांच्या झाडांचे सुशोभिकरण करण्यात येत असून तेथे एनर्जी जनरेटर सायकल बसविण्यात येणार आहेत. ज्यांना सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी यायचे आहे त्यांनी या सायकलच्या मदतीने व्यायाम करायचा आहे, या सायकलींगमधून उर्जा निर्माण होणार असून प्रत्येकाने किती उर्जा तयार केली हेही पाहता येणार आहे.

या शिवाय कोर्टकॉर्नरनजिक जट्रोपा व कडूनिंबाची झाडे लावून तेथे अतिरिक्त ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे. या झाडामुळे मधमाशी व फुलपाखरे येतात व बाराही महिने या झाडांना फुले राहत असल्याने हा पट्टा सुंदर दिसणार आहे. शहरातील विविध चौकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड बसविण्यात आले असून शहरात काही ठिकाणी स्टीलच्या कचराकुंड्याही बसविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पूलांवरही विद्युत रोषणाईही केली गेली आहे. भिगवण रस्त्याच्या कडेला तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौकापर्यंत सुंदर पदपथ निर्मितीही होणार आहे.

बारामती अधिक सुबक व सुंदर करण्यासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह नगरपालिकेची टीम जोमाने कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com