बारामती-दौंड लोहमार्गाचे फेब्रुवारीपर्यंत विद्युतीकरण

Railway-Electric-Line
Railway-Electric-Line

बारामती शहर - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हाती घेण्यात आलेले बारामती दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्या दृष्टीने रात्रंदिवस हे काम सध्या सुरू आहे. 

डिझेल इंजिनामुळे हवेत हानिकारक असा कार्बन डाय मोनाक्‍साईड वायू हवेत सोडला जातो. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. पर्यावरण संतुलन कायम राखण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने देशात सर्वच ठिकाणी डिझेल इंजिने टप्याटप्याने बंद करून त्याजागी विद्युत इंजिनांचा वापर केला जात आहे. या योजनेअंतर्गत बारामती-दौंड या ४४ कि.मी. मार्गावरही सध्या बारामती व दौंड अशा दोन्ही बाजूंनी विद्युतीकरणासाठी खांब उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

यासाठी शिरसाई रेल्वे स्थानकानजिक सबस्टेशन उभारले जाणार आहे. शिर्सुफळपासून साडेतीन कि.मी. लांबीची टॉवर लाइन टाकून त्याचा सप्लाय या मार्गाला दिला जाणार आहे. याबाबत सर्वच कामे वेगाने सुरू असून १५ फेब्रुवारी रोजी विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. 

घातक वायूचे प्रमाण शून्यावर येणार
सध्या बारामतीत दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वे गाड्या येतात. महिन्यातून दोनदा मालगाडी येते. यामुळे हवेत डिझेल इंजिनाद्वारे कार्बन मोनाक्‍साईड हा घातक वायू पसरतो. विद्युतीकरणानंतर डिझेल इंजिनच येणार नसल्याने पर्यावरण संतुलन राहण्यासोबतच या वायूचे प्रमाण शून्यावर येणार आहे.

स्वयंचलित यंत्रणा
बारामती रेल्वे स्थानकावरही मानवी स्तरावर चालविली जाणारी सिग्नल यंत्रणा बंद होणार आहे. त्या जागी अद्ययावत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. यासाठी रेल्वे स्थानकावर एक स्वतंत्र इमारतही उभारण्यात आली असून, या इमारतीतूनच गाड्यांचे नियंत्रण केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com