बारामती : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी उपमुख्यमंत्र्याना साकडे

बदली न झालेस आंदोलनाचा इशारा
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

पुणे (डोर्लेवाडी) : डोर्लेवाडी ता.बारामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचा कार्यकाळ सलग १२ वर्षाहून अधिक झाला आहे.त्यांचे बाबत अनेक तक्रारी असताना बदली बाबत ग्रामसभेचा ठराव होऊनही राजकीय वरदहस्ताने नियमानुसार बदली होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदली करणे बाबत ग्रामपंचायतीने निवेदन देऊन साकडे घातले आहे.

येथील येथील वैध्यकीय अधिकारी वैशाली देवकाते यांचे बाबत ग्रामस्थांकडे वारंवार तक्रारी आलेनंतर बदली करणे बाबत दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ रोजी ग्रामसभेत ठराव देखील झाला आहे.मागील वर्षभरात कोरोनाच्या परिस्थितीत लसीकरणाबाबत तक्रारी झाल्यानंतर त्यांच्या प्रसारमाध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.त्यानंतर डॉ.देवकाते यांनी पत्रकार यांना शिवीगाळ केली होती तसेच गावातील काही पदाधिकारी यांचेवर लेखी तक्रार देऊन खोटे आरोप केले होते.त्याची बारामती पोलीस स्टेशन येथे चौकशी झालेनंतर डॉ वैशाली देवकाते यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व निराधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र येथेच कार्यरत असलेले त्यांचे पती वैध्यकीय अधिकारी बापूराव दडस यांनी सर्वांची माफी मागितली होती.त्यानंतर तालुका वैध्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी बदली करणार असल्याचे सांगितले होते.मात्र ही घटना होऊन ३ महिने उलटूनही अजून कोणतीच कार्यवाही झाली नाही. काटेवाडी येथे बदली झाल्याचे तोंडी सांगितले जात आहे.मात्र डॉ.वैशाली देवकाते या अजूनही डोर्लेवाडी येथेच काम करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे नियमानुसार बदली होणे बाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.शिवाय बदली न झालेस ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या मानसिकतेत असल्याबाबतही निवेदनात नमूद केले आहे. याबाबत वैध्यकीय अधिकारी बापूराव दडस म्हणाले, नियमानुसार बदली करणे बाबत आम्ही पुणे जिल्हा वैध्यकीय अधिकारी यांचेकडे अर्जाद्वारे मागणी केली आहे.बदली झालेस आमची काही अडचण नाही.

Ajit Pawar
शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

वैध्यकीय अधिकारी यांनाच नियम का वेगळा ?

आदर्श काम करणारे तहसीलदार,पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक,आरोग्य सेवक,वायरमन यांची झालेली बदली रद्द करणे बाबत अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलने होतात.मात्र नियमानुसार बदली करणे भाग असल्याचे वरिष्ठ विभागाकडून सांगितेले जाते.इथे मात्र अनेक तक्रारी ग्रामसभेचा ठराव होऊनही बदली होत नसल्याने यांनाच नियम वेगळा का असा सवाल डोर्लेवाडी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

इतर गावांकडून चांगले कामाबाबत अभिनंदन ...

डोर्लेवाडी ग्रामस्थांनी बदली करणे बाबत तक्रारी केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील समाविष्ट झारगडवाडी,सोनगाव,गुणवडी येथील ग्रामपंचायतीनी कोरोना काळात चांगले काम केले बाबत सत्कार व प्रशस्तीपत्रकही दिली आहेत.मेखळी ग्रामपंचायतीने या प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा मिळत असल्याने गावचा समावेश करावा अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com