बारामतीतील डॉक्‍टरांची अमेरिकेत ‘कीर्ती’

Dr Kirti Pawar
Dr Kirti Pawar

बारामती - येथील काही डॉक्‍टरांनी केलेल्या संशोधनास अमेरिकेमध्ये प्रमाण मानण्यात आले आहे. अमेरिकेच्या एन्व्हॉर्यन्मेंटल पॉलिसी एजन्सी (यूएस ईपीए) या संस्थेने बारामतीतील डॉ. कीर्ती पवार यांच्यासह डॉ. रमेश भोईटे, डॉ. चंद्रकांत पिल्ले, डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. धनंजय माळशिकारे यांच्या टीमने ‘कीटकनाशके सेवन केल्यामुळे होणारी विषबाधा’ या विषयातील संशोधनावर केलेले काम व वैद्यकीय क्षेत्रात नामांकित दि लॅन्सेट या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनास प्रमाण मानले आहे. मॉडरेट टू सिव्हीयर पेस्टिसाईड पॉयझनिंगमध्ये त्यांनी लिहिलेल्या औषधमात्रेला ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी मानण्यात आले आहे. 

२०१३ ते २०१८ या कालखंडातील मार्गदर्शिकेमध्ये डॉ. कीर्ती पवार यांच्या शोधनिबंधास अग्रगण्य स्थान दिले गेले आहे. या शिवाय ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्येही या शोधनिबंधास क्‍लिनिकल गाइड मानण्यात आले आहे. विषबाधेवर हे संशोधन रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. हे संशोधन जागतिक पातळीवर पोचण्यासाठी डॉ. रमेश भोईटे, डॉ. सतीश पवार, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. दिलीप कर्नाड, डॉ. जे. व्ही. दिवाटीया, समाजसेविका श्‍यामला देसाई या सर्व मार्गदर्शकांचे मोठे योगदान होते, असे डॉ. कीर्ती पवार यांनी नमूद केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल येथे केलेले संशोधन ज्यात डॉ. पवार यांनी सुचवलेल्या प्रॅलिडॉक्‍साइम या अँटीडोटच्या मात्रेला दुजोरा दिला आहे व हीच मात्रा गंभीर व अतिगंभीर स्वरूपाचे विषबाधेचे रुग्ण वाचविण्यासाठी उपयोगी ठरू शकते, असे अमेरिकेतील एन्व्हॉर्यन्मेंटल पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

लवकरच पुस्तक प्रकाशित करणार
मॅनेजमेंट ऑफ पेस्टिसाइड पॉयझनिंग हे पुस्तक डॉ. कीर्ती पवार लवकरच प्रकाशित करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्‍टरांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com