बारामतीच्या जिरायती भागाला शिरसाईच्या पाण्यामुळे दिलासा

विजय मोरे
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. 

उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. 

बारामतीच्या जिरायती भागात यंदा जून महिन्यापासून दमदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामात पेरण्या झाल्या नाहीत. पाऊस नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजना 18 ऑगस्टला सुरु करण्यात आली होती. 24 सप्टेंबरला योजनेचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. यावेळी एक महिन्याहून अधिक योजनेतून पाणी सोडण्यात आल्याने योजनेतील लाभार्थी गावाना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी सुपे, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, गाडीखेल, जराडवाडी, बोळोबाचीवाडी (ता.दौंड) कारखेल, बऱ्हाणपूर, सोनवडी सुपे, अंजनगाव, जळगाव सुपे या गावातील पाझर तलाव, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध तसेच शेततळी शिरसाई योजनेच्या पाण्यातून भरण्यात आली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

योजनेची वीस लाख रुपये पाणीपट्टी जमा...
योजनेचे आवर्तनादरम्यान पाणी पट्टी पोटी शेतकऱ्यांनी वीस लाख रुपये जमा केले आहेत. या आवर्तनाला तेरा गावात 250 ते 260 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. यावेळी पाणी मागणी अर्ज भरुन घेवून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार योजनेचे पाणी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अशी माहिती शिरसाई उपसा योजनेचे शाखाअभियंता एल. जी भोंग व स्थापत्य अभियांत्रिकी अमोल शिंदे यांनी दिली. 
 

Web Title: baramati farming have support of shirsai