एन्व्हॉर्यमेंटल फोरम बारामतीत आयोजित करणार बारामती फेस्टिव्हल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunetra Pawar

बारामतीच्या अर्थकारणाला गती देणारा व देशाला सांस्कृतिक व विकासात्मक ओळख करुन देणारा बारामती फेस्टिव्हल आयोजित केला जाणार.

Baramati Festival : एन्व्हॉर्यमेंटल फोरम बारामतीत आयोजित करणार बारामती फेस्टिव्हल

बारामती - येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने येत्या काही महिन्यात बारामतीच्या अर्थकारणाला गती देणारा व देशाला सांस्कृतिक व विकासात्मक ओळख करुन देणारा बारामती फेस्टिव्हल आयोजित केला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सुनेत्रा पवार बोलत होत्या. अभिनेते किरण माने, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव नीलिमा गुजर, विश्वस्त किरण गुजर, डॉ. आर.एम. शहा, मंदार सिकची, रजिस्टार श्रीश कुंभोज, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

पर्यावरण अभ्यासक अनुज खरे यांना या प्रसंगी यंदाचा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबतच बारामतीच्या नावलौकिकात भर घालणारे अक्षय काकडे, समर्थ भोईटे, डॉ. नीता दोशी, डॉ. सोमनाथ माने, डॉ. सचिन कोकणे, राधिका दराडे तसेच नारोळी येथील श्री तुकाई देवी समृद्ध शेतकरी गट, आपल्या विनोदी करामतीने महाराष्ट्राला वेड लावणारी चांडाळ चौकडीची टीम, तसेच मुर्टी येथील ग्रामविकास मंच अशा सहा व्यक्ती व तीन संस्थांना बारामती आयकॉन या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

बारामतीत सुनेत्रा पवार यांनी जे काम सुरू केले आहे त्या कामासाठी एक सेलिब्रिटी म्हणून माझी जी काही मदत लागेल ती मदत मी विनामूल्य करण्यास तयार आहे, असे बिग बॉस फेम किरण माने म्हणाले.

याप्रसंगी अनुज खरे यांनी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत, आगामी काळामध्ये पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. याप्रसंगी रामदास जगताप, संगीता काकडे व डॉ. सोमनाथ माने यांनी आयकॉन पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी संस्थेच्या तेरा वर्षातील कार्याचा सविस्तर आढावा घेतला. आगामी काळामध्ये फोरमच्या वतीने मधुमेह रोखणे व मधुमेह होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही दिली.

ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सातव यांनी बारामतीच्या विकासाचा आढावा याप्रसंगी सादर केला. उद्याच्या विकसीत बारामतीच्या विकासाच्या प्रकल्पांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील याप्रसंगी फोरमच्या वतीने आयोजित केले गेले.

फोरमच्या पुस्तिकेचे तसेच आगामी काळात घेण्यात येणाऱ्या बारामती फेस्टिव्हलच्या लोगोचे अनावरण याप्रसंगी मान्यवरांनी केले.

बारामती फेस्टिव्हल होणार

येत्या काही महिन्यांमध्ये बारामतीच्या अर्थकारणाला दिशा देण्याच्या उद्देशाने व बारामतीच्या ऐतिहासिक सांस्कृतिक व विकासात्मक वाटचालीची ओळख राज्याला व देशाला व्हावी या उद्देशाने ऑफ एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती फेस्टिव्हल आयोजित करणार एन्व्हॉर्यमेंटल फोरम बारामतीत आयोजित करणार.

टॅग्स :Baramatifestival