बारामती: धनगर समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत निकराचा लढा 

मिलिंद संगई
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बारामती शहर - धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यासह इतरही अनेक प्रलंबित मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत निकराचा लढा देण्याची शपथ आज बारामतीत घेण्यात आली. 

बारामती शहर - धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यासह इतरही अनेक प्रलंबित मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत निकराचा लढा देण्याची शपथ आज बारामतीत घेण्यात आली. 

शहरातील इंदापूर चौकात आज धनगर समाज बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी निकराचा लढा देण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या प्रसंगी धनगर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या पैकी काही मान्यवरांनी आपले विचारही या ठिकाणी व्यक्त करत समाजाच्या मागण्यांचा शासनाने तातडीने विचार करुन आरक्षण द्यावे अशी मागणी केली. धनगड समाजाची व्यक्ती आम्हाला दाखवून द्यावी अशीही मागणी या वेळी काही जणांनी केली, शासनाने धनगड समाजाचे लोक अस्तित्वात असल्याचे चुकीचे अहवालात नमूद केल्याचाही आरोप काही वक्त्यांनी या वेळी भाषणात केला. 

या प्रसंगी धनगर समाजातील काही युवकांनी आपल्याकडील एनटीची प्रमाणपत्रे निषेध म्हणून शासनाला परत केली. निवासी नायब तहसिलदार ठोंबरे यांनी या प्रसंगी समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. शहरातील अहिल्यादेवी चौकात अतिशय शांतता व शिस्तीत आंदोलन झाले. पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ व सहका-यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

धनगर म्हणून एकत्र यायचे...
या पुढील काळात पक्ष, संघटना, संस्था हे सर्व भेद ठेवून सर्व धनगर समाज बांधवांनी निकराचा लढा देण्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन विविध वक्त्यांनी केले. 

Web Title: Baramati: The fight for the protests until the demands of the Dhangar community are accepted