बारामती-जेजुरी रस्ता होणार तीनपदरी

मिलिंद संगई
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बारामती शहर - वाहतूक जलदगतीने व्हावी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी बारामती-मोरगाव-जेजुरी हा रस्ता तीनपदरी होणार आहे. यामुळे पुण्याला जातानाचा बारामतीकरांचा वेळ वाचणार आहे. 

राज्य सरकारने नव्याने हाती घेतलेल्या हायब्रीड ॲन्युइटी उपक्रमांतर्गत मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नीरा नरसिंहपूर हा रस्ता तीनपदरी करण्यात येणार आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण या प्रकल्पांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग सध्या दुपदरी आहे. 

विशेष म्हणजे कोणतेही अतिरिक्त भूसंपादन न करता उपलब्ध जागेतूनच हा रस्ता करण्यात येणार आहे. याशिवाय या रस्त्यावरील काही धोकादायक वळणे काढून रस्ता सरळही केला जाणार आहे. सात मीटर रुंदीचा हा रस्ता आता दहा मीटर होईल, यामुळे दोन वाहने सहजतेने जाऊ शकतील, ओव्हरटेकही सहजतेने करता येईल. 

दरम्यान, जेजुरी-मोरगाव-सुपे हा रस्ता अष्टविनायक मार्गामध्ये तीन पदरी होणार असल्याने बारामती-मोरगाव-जेजुरी हा रस्ता तीन पदरीमध्ये लवकरच रूपांतरित होणार आहे. मोरगाव ते नीरा नरसिंहपूर या रस्त्याचे काम दोन महिन्यांत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता असल्याने या रस्त्याचे कामही लवकर व्हावे, असा बांधकाम विभागाचाही प्रयत्न आहे.

प्रवास सुखकर होईल 
बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी बारामती-मोरगाव-जेजुरी-सासवड या रस्त्याचा वापर होतो. जेजुरी ते दिवे घाटापर्यंत रस्ता रुंद झालेला आहे. बारामती ते जेजुरीपर्यंत रस्ता रुंदीकरणाची मागणी होती. तीनपदरी रस्ता झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Baramati-Jejuri Road Development