‘बारामती लोकसभेला भाजपचाच उमेदवार’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

यवत - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत भाजपचाच उमेदवार दिला जाणार आहे. येथे भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठीच निवडणूक लढवणार आहे. येथील निवडणूक जिंकायचीच, असा हिय्या भाजपने केला आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे,’’ असे या मतदारसंघाचे विस्तारक व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

भुजबळ यांनी यवत (ता. दौंड) येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे संयोजक वासुदेव काळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख धीरज भळगट व तालुकाध्यक्ष गणेश आखाडे आदी उपस्थित होते. वासुदेव काळे म्हणाले, ‘‘सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात भाजपची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजची स्थिती फार वेगळी आहे. आम्ही आता बूथ पातळीवर मोठे संघटन उभे केले आहे. त्यामुळे या पुढे कोणीही उमेदवार असो भाजप जिंकण्यासाठी लढणार, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.’’ दरम्यान, या वेळी भुजबळ यांना, मित्र पक्ष म्हणून रासपचे महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत विचारल्यावर, ‘‘तो त्यांच्या पक्षाचा प्रश्‍न आहे,’’ असे सांगत त्यांनी बाजू मारून नेली.

Web Title: Baramati Lokssabha Election Candidate Shivaji Bhujbal Politics