बारामती नगरपालिकेला राज्य शासनाचा निर्णय मान्य नसल्याचे चित्र

मिलिंद संगई
सोमवार, 18 जून 2018

बारामती (पुणे) : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांची इतिवृत्त सभा झाल्यावर सात दिवसात नगरपालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचा राज्य शासनाचा नियम बारामती नगरपालिका प्रशासनास मान्य नाही असेच चित्र आहे. दर महिन्यात दोन तारखेला नगरपालिकेची आता नियमित सर्वसाधारण सभा होते. शासनाच्या निर्देशानुसार सात दिवसात म्हणजे नऊ तारखेला सभेचे इतिवृत्त व ठराव संकेतस्थळावर येणे गरजेचे असल्याचे शासननिर्देशात नमूद करण्यात आले आहे. 

नगरपालिकेच्या सभेत शहराच्या विकासकामांच्या दृष्टीने काय निर्णय झाले याची माहिती नागरिकांनाही व्हावी व यात प्रक्रीयेत पारदर्शकता यावी या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला. बारामती नगरपालिका प्रशासनाला मात्र हा निर्णय मान्य नसावा किंवा शासननिर्देशांचे पालन करायचेच नाही असे प्रशासनाने ठरवले आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. 
सलग दुस-या महिन्यातही सर्वसाधारण सभा होऊन सोळा दिवसांचा कालावधी उलटूनही इतिवृत्त व ठराव संकेतस्थळावर आलेले नाहीत किंवा नगरपालिकेच्या फलकावर त्याची माहिती दिलेली नाही. 

या बाबत मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्याशी संपर्क साधला असता इतिवृत्त व ठराव टाकायचे राहून गेले आहेत, आजच ते टाकण्यात येतील असे उत्तर त्यांनी दिले. वास्तविक सभागृहात व्यवस्थित टाईप केलेले ठरावच येतात ते फक्त स्कॅन करुन संकेतस्थळावर टाकणे इतकेच काम प्रशासनाला असतानाही ते वेळेत का होत नाही याचे उत्तर कोणीही देऊ शकले नाही. 

Web Title: baramati nagarpalika decline decision of posting report on website of state government