Nana Patole : मोदी सरकारचा पराभव अटळ, परिवर्तन होणार

देशभरात परिवर्तनाचे वारे सुरु झाले असून 2024 मध्ये राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान बनतील, मोदी सरकारचा पराभव अटळ आहे, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
nana patole
nana patole sakal
Summary

देशभरात परिवर्तनाचे वारे सुरु झाले असून 2024 मध्ये राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान बनतील, मोदी सरकारचा पराभव अटळ आहे, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

बारामती - देशभरात परिवर्तनाचे वारे सुरु झाले असून 2024 मध्ये राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान बनतील, मोदी सरकारचा पराभव अटळ आहे, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचा सत्तेचा माज या देशातील जनताच उतरवेल, असे भाकीत केले.

ते म्हणाले, या राज्याचे मुख्यमंत्री औरंगाबादच्या सभेत जाहिरपणे आम्ही पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे हस्तक असल्याचे सांगतात, गुजरातमध्ये राज्याचे उद्योग गेले, सीमाप्रश्नावर गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावरही कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई आमची आहे असे वक्तव्य करण्याचे धाडस करतात व राज्यातील सरकार काहीही बोलत नाही याचा अर्थ असा आहे.

आपल्या मूठभर उद्योगपतींना देशविकण्याचे काम सध्या सुरु आहे, बेरोजगारी वाढते आहे, गरीबी वाढते आहे, शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहे, मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून ज्या पध्दतीने दबावतंत्राचा जो वापर सुरु आहे तो आता लोकांना समजतो आहे, त्या मुळे भविष्यात चित्र बदलेले पाहायला मिळेल.

संग्राम थोपटे हे साखर कारखानदारीच्या प्रश्नाबाबत दिल्लीला गेले होते, तेथून ते परत आल्यानंतर त्यांनी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मात्र यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, थोपटे परिवार कायमच कॉंग्रेस सोबत होता आणि तो कायमच असेल असे ते म्हणाले.

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याने भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, परिवर्तन करण्याचा निर्णय लोकांनीच घेतला असल्याने भविष्यात निश्चित बदल घडलेला दिसेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com