बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

मिलिंद संगई
रविवार, 2 जुलै 2017

नगरपालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानाअंतर्गत पाच हजार झाडे लावण्याच्या अभियानास आजपासून प्रारंभ झाला. बारामती रेल्वे स्थानकानजिक एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन हे अभियान सुरु झाले.

बारामती - नगरपालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानाअंतर्गत पाच हजार झाडे लावण्याच्या अभियानास आजपासून प्रारंभ झाला. बारामती रेल्वे स्थानकानजिक एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन हे अभियान सुरु झाले.

या अभियानामध्ये बारामती शहर व वाढीव हद्दीत पाच हजार झाडे लावण्यासाठी नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. नगरपालिकेच्या उद्यान विभागाने कोणत्या विभागात कोठे किती झाडे लावायची याचे नियोजन केलेले असून सगळीकडे खड्डे घेण्याचेही काम पूर्ण झाले आहे. बारामतीच्या भौगोलिक स्थितीचा विचार करुन या वातावरणात चांगली वाढतील अशी कदंब, कुसुंब, प्लेटोफोरम, लिंब, जांभूळ, पिचकारी, मोहगणी, वड, पिंपळ, शिरीष, शिसम, औदुंबर अशा झाडांची शहरात लागवड केली जाणार आहे. बारामती शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हजारो झाडे नव्याने लागली असून शहर हिरवेगार दिसते. दरम्यान आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, गटनेते सचिन सातव, नगरसेवक संजय संघवी, बाळासाहेब जाधव, सुधीर पानसरे, समीर चव्हाण, नगरसेविका सविता जाधव, आशा माने, नीता चव्हाण, नीलीमा मलगुंडे, अनिता माने, सुरेखा चौधर, अश्विनी गालिंदे यांच्यासह उद्यान विभाग प्रमुख मिलिंद भिसे आदी उपस्थित होते. रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.

ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

Web Title: baramati news pune news tree plantation sunetra pawar