स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पीछेहाटीमुळे बारामतीत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

बारामती शहर - स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बारामतीचे नाव पहिल्या शंभर शहरांतही समाविष्ट नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ज्या निकषांवर आधारित ही स्पर्धा होती, ते निकष पूर्ण करण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आल्याने ही पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यातील बहुसंख्य नगरपालिकांनी सहभाग नोंदविला. बारामती नगरपालिकेनेही त्यासाठी तयारी केली होती. प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर मात्र बारामतीचा क्रमांक देशात थेट १७३ वा असल्याचे समजल्यावर सर्वांचीच निराशा झाली. 

नगरपालिका प्रशासनाने ज्या ताकदीनिशी तयारी करायला हवी होती, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी या स्पर्धेकडे ज्या गांभीर्याने पाहायला हवे होते आणि नगरसेवकांनी एकजूट दाखवत संपूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेत उतरायला हवे होते, त्यापैकी काहीच न दिसल्याने स्वच्छतेबाबत आघाडीवर असूनही स्पर्धेत मात्र बारामतीच्या पदरी पार निराशा पडली. 

स्वच्छ सर्वेक्षणासाठी सर्वच नगरपालिकांना दस्तऐवजांची गुणवत्ता, प्रत्यक्ष पाहणीतील गुण, स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद अशा चार हजार गुणांची परीक्षा होती. या सर्वांसाठी नगरपालिका प्रशासनाने पुरेशी तयारी करणे गरजेचे होते. मात्र, त्या काळात अशी तयारीच झाली नाही. शेजारील इंदापूरला पहिल्या ५० मध्ये स्थान मिळाले, बारामतीला पहिल्या दीडशेमध्येही स्थान मिळविता आले नाही. 

व्यस्त प्रमाण कारणीभूत
हद्दवाढीनंतर वाढलेली लोकसंख्या व अपुरा कर्मचारी वर्ग याचा स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत आहे. सरकारचे अनेक निर्देश दुर्लक्षित राहतात. परिणामी, या स्पर्धेत बारामती नगरपालिकेला गुण प्राप्त झाले नाहीत, असेही प्रशासनाने सांगितले. 

निर्णय अमान्य
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बारामतीला स्थान न मिळाल्याबद्दल अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय चुकीचा व अमान्य असल्याचे नमूद केले आहे. इतर शहरांच्या तुलनेत बारामती स्वच्छ असतानाही बारामतीवर अन्याय झाल्याचे नागरिकांनी त्यात नमूद केले. 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बारामतीला यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पुढील स्पर्धेत शहराचा क्रमांक पहिल्या पाच शहरात असेल, या उद्दिष्टासह तयारी करू शहराची स्वच्छता वादातीत आहे. मात्र, काही त्रुटी असतील तर त्या दूर करू. 
- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती

Web Title: baramati news swachh survey campaign