बाप रे! बारामतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला...

In Baramati the number of coronavirus reached 438
In Baramati the number of coronavirus reached 438

बारामती : शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु झाल्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. काल बारामतीत आरटीपीसीआर तपासणीसाठी 88 तर रॅपिड अँटीजेनसाठी 44 असे एकूण 132 नमुने तपासणीसाठी आले होते. 

धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही, मग आम्ही जमिनी का द्यायच्या? शेतकऱ्यांचा शासनाला...

या पैकी आरटीपीसीआर तपासणीमध्ये 35 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 53 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. रॅपिड टेस्टच्या 44 पैकी 20 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. बारामतीतील कोरोनारुग्णांचा आकडा ता 438 इतका झाला आहे. दरम्यान बारामती शहरातील बुरुडगल्ली, संघवीनगर, कुंभार गल्ली कसबा, साठेनगर, जळोची, अशोकनगर, मार्केट यार्ड रस्ता या भागातील तर तालुक्यातील पाहुणेवाडी, काटेवाडी घुले वस्ती, पारवडी व माळेगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व पॉझिटीव्ह रुग्ण रॅपिड अँटीजेन टेस्टमधून निष्पन्न झाले आहेत. 

बारामती शहरात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत व्यवहार सुरु ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र बहुसंख्य दुकानात आता नियम पाळण्याबाबत शिथीलता आली आहे. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या तोंडावर मास्क असणे अनिवार्य आहे, त्याचे तापमान मोजणे गरजेचे आहे शिवाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक यांची नोंद करुन ठेवण्याचे प्रशासनाने निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांचे पालन अनेक ठिकाणी होत नाही, अशी स्थिती आहे. ज्या दुकानांमध्ये गर्दी जास्त आहे, अशा ठिकाणी सर्रास हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे. 

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

दुसरीकडे पाच वाजता व्यवहार बंद करण्यामागे लोकांची रस्त्यावरची गर्दी कमी व्हावी असा उद्देश होता. काही दुकानदार मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करीत मन मानेल त्या पध्दतीने दुकाने सुरुच ठेवत आहे. अशा दुकानदारांसह नियमांचे उल्लघंन करणा-यांविरुध्द कारवाई करण्यास नगरपालिका प्रशासनाचे पार दुर्लक्ष होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com