बारामती : पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिका-यांचे अधिकार काढले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

बारामती शहर : येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. शिक्षण सहसंचालक राजेंद्र गांधले यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना या बाबत एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 

हे अधिकार का काढून घेण्यात आले या बाबत या पत्रात कोणतेही कारण नमूद करण्यात आले नसून पुढील आदेश येईपर्यंत हे अधिकार काढून घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांना कळविण्यात आले आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांचे अधिकार काढले याची माहिती उपलब्ध झाली नाही. 

दरम्यान या बाबत किशोर पवार यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला असे पत्र अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून जे आदेश दिले जातील त्यांचे आपण पालन करु असे त्यांनी नमूद केले. 

शिविगाळ केल्याचा आरोप...
दरम्यान जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांनी फोनवरुन एका शिक्षीकेच्या बदलीसंदर्भात आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप किशोर पवार यांनी केला. खैरे यांनी अत्यंत असभ्य भाषेत आपल्याशी संवाद साधल्याचे किशोर पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्यांना अशा भाषेत एका अधिका-याशी संवाद साधणे शोभत नसल्याचे ते म्हणाले. 

अधिकारी करतात चुकीचे काम
दरम्यान आपण कोणालाही शिवीगाळ केली नसल्याचे भरत खैरे यांनी सांगितले. बदलीस पात्र नसलेल्या एका शिक्षीकेचा समावेश बदलीच्या यादीत कसा झाला, या बाबीचा संबंधित शिक्षिकेला त्रास होत असल्याचे आपण किशोर पवार यांना सांगितले, शिवीगाळ करण्याचा प्रश्नच नाही, असे खैरे म्हणाले. चुकीचे काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाईची आपण मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: Baramati Panchayat Samitis Education Officer told to stay off duty