Video:अजित पवारांचं थाटात स्वागत; बारामतीच्या मिरवणुकीत हेलकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

टीम ई-सकाळ
Friday, 10 January 2020

बारामतीकरांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण असून खूप मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या अभिनंदनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत .

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती शहरातून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मंत्रिपदाचा शपथविधी आणि इतर कामे आटोपून आज, अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. त्यानंतर त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - अजित पवारांमुळं अधिकाऱ्यांची धावपळ

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांचा उत्स्फूर्त जल्लोष
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुसऱ्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यानिमित्तानं त्यांचा बारामतीत आज, सपत्निक सत्कार करण्यात येत आहे. तत्पूर्वी. बारामतीत कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अजित पवार यांची मिरवणूक निघाली असून, शहरातील गुणवडी, गांधी, सुभाष चौक भिगवण चौक मार्गे शारदा प्रांगणात मिरवणुकीचा समारोप होत आहे. बारामतीकरांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण असून खूप मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या अभिनंदनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत . बारामती शहरात ठिकठिकाणी कमानी तसेच फ्लेक्स लावून अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हार घालून तसेच बुके देता, अजित पवार यांचा नागरिकांनी सत्कार केला. अजित पवार यांच्यावर फुलं उधळण्यात आली. अजित पवार यांचा शारदा प्रांगण येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

आणखी वाचा - अधिकाऱ्यांनी लवकर उठलं तर बिघडलं कुठं:अजित पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati people welcomes deputy cm ajit pawar flowers from helicopter