उन्हाच्या तीव्रतेचा बारामतीकरांना चटका 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

टोपी व गॉगल लावल्याशिवाय आज घरातून बाहेर पडणे लोकांना अवघड झाले होते. शीतपेय तसेच आईसक्रीम पार्लर्समध्ये उन्हाच्या तीव्रतेने गर्दी उसळलेली दिसत होती. उन्हाचा चटका आज चांगलाच जाणवत असल्याने अनेकांनी दुचाकीऐवजी चारचाकी गाड्या बाहेर काढल्या होत्या. 

बारामती : उन्हाच्या तडाख्याने आज बारामतीकरांच्या अंगाची लाही लाही झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च म्हणजे 40 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची आज बारामतीत नोंद झाली. दुपारी उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावरची वाहतूक मंदावली होती, उन्हाच्या तीव्रतेने लोकांनी घरातच बसणे पसंत केले. 

टोपी व गॉगल लावल्याशिवाय आज घरातून बाहेर पडणे लोकांना अवघड झाले होते. शीतपेय तसेच आईसक्रीम पार्लर्समध्ये उन्हाच्या तीव्रतेने गर्दी उसळलेली दिसत होती. उन्हाचा चटका आज चांगलाच जाणवत असल्याने अनेकांनी दुचाकीऐवजी चारचाकी गाड्या बाहेर काढल्या होत्या. 

दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेने आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले. उन्हात टोपी व गॉगल लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे त्यांनी नमूद केले. 

Web Title: Baramati Peoples Affected by Summer

टॅग्स