बारामती पोलिसांनी दिला सुखद धक्का; चोरीला गेलेले गंठण...

मिलिंद संगई
Monday, 31 August 2020

ऐवज चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची अपेक्षा तशी धूसरच असते, मात्र आज बारामतीतील काही नागरिकांना पोलिसांनी सुखद धक्का दिला.

बारामती (पुणे) : ऐवज चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची अपेक्षा तशी धूसरच असते, मात्र आज बारामतीतील काही नागरिकांना पोलिसांनी सुखद धक्का दिला. चोरीला गेलेला ऐवज आज नागरिकांना देऊन शहर पोलिसांनी एक चांगली प्रथा कायम केली. पोलिसांना मुददेमाल परत देण्याचा अधिकार वापरत आज सोन्याचे गंठण, चार मोबाईल व चार मोटारसायकली परत दिल्या गेल्या. 

समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत दिला गेला. 
दरम्यान, घरात घुसून गंठण चोरुन नेणा-या आकाश संपत पवार (रा. बसस्टँडमागे, आमराई, बारामती) व त्याचा साथीदार विक्या उर्फ हुक्या शिवा काळे (रा. फलटण, जि. सातारा) यांना पोलिसांनी आठ दिवसात जेरबंद केले. या चोरीने बारामतीत घबराटीचे वातावरण होते. 

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद

मात्र, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, फौजदार पद्मराज गंपले, योगेश शेलार तसेच सहायक फौजदार संदीपान माळी, पांडुरंग गोरवे, पोपट नाळे, सिध्देश पाटील, राजेश गायकवाड, अंकुश दळवी, सुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, पोपट कोकाटे, अकबर शेख, उमेश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली

 जॅकेट व बॅटरीवरुन घेतला शोध...
घरात घुसून गंठण चोरीप्रकरणी चोराचे जॅकेट व त्याने वापरलेली बॅटरी यांचीच माहिती मिळाली होती. मात्र शहरातील शिवाजी चौकात काही लोक नव्याने राहायला आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जॅकेट व बॅटरीचा पहिल्यांदा शोध घेतला. हे मिळाल्यानंतर संबंधित महिलेने ते ओळखल्यावर त्याच्यावरुन पोलिस चोरांपर्यंत पोहोचले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरात घुसून माझ्या आईच गंठण चोरट्यांनी चोरुन नेल्यानंतर आमच्या मनात भीतीचे वातावरण होते. पोलिसांनी इतक्या तत्परतेने तपास करुन चोरांना तर पकडलेच पण आईचे गंठणही कोणतीही प्रक्रिया पार न पाडता आम्हाला मिळाले हा आमच्या कुटुंबासाठी सुखद अनुभव होता.

- महेश जाधव, फिर्यादी. बारामती. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati police returned the stolen ganthan