बारामतीत साकारले वारकऱ्यांचे शिल्पसमूह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

बारामती - शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वारकऱ्यांच्या शिल्पसमूहाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. २०) होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यानंतरचे सर्वांत मोठे मुक्कामाचे गाव म्हणून बारामतीचा समावेश होतो. 

या सोहळ्याची वर्षभर कायम स्मृती राहावी व बाहेरगावाहून येणाऱ्यांनाही हे पालखी सोहळ्यातील प्रमुख गाव आहे याची माहिती व्हावी, या उद्देशाने बारामती नगरपालिकेने पालखीच्या स्वागताच्या ठिकाणी वारकऱ्यांचे  शिल्पसमूह उभारले आहे. या शिल्पावर अखेरचा हात फिरविण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये दिंडीतील वारकरी, वीणेकरी, तुळशी वृदांवन घेतलेल्या महिला वारकरी अशी शिल्पे आहेत. 

पाटस रस्त्याच्या चौकात पंढरीच्या महादेवाच्या मंदिरानजीक निसर्गरम्य वातावरणात हे शिल्प साकारण्यात आल आहे. 

 भक्तिमय वातावरण तयार व्हावे व यातून वारकरी संप्रदायाची बारामतीची परंपरा वर्षभर नजरेसमोर राहावी, या उद्देशाने शिल्प साकारले आहे. 
 येत्या २० जून रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या  शिल्पसमूहाचे उद्‌घाटन केले जाणार आहे.

Web Title: baramati pune news warkari craft