राज्यात बारामती आरटीओ कार्यालय राज्यात अव्वल

राज्यात बारामती आरटीओ कार्यालय राज्यात अव्वल

बारामती : सर्वांगिण कामकाजाच्या निकषावर बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यात अव्वल ठरले आहे. राज्यातील पन्नास प्रादेशिक परिवहन कार्यालयांची पाहणी करुन नुकतेच याचे निकाल जाहिर झाले, त्यात 100 पैकी 95 गुण प्राप्त करत बारामतीच्या कार्यालयाने राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला. औरंगाबाद दुस-या तर सोलापूर तिस-या क्रमांकावर आहे. 

अर्जांचा जलदगतीने निपटारा, सारथी प्रणालीमध्ये अर्जांच्या निर्गतीचा वेग, येणा-या तक्रारींचा निपटारा किती गतीने होतो, महसूल गोळा करण्याची टक्केवारी अशा निकषांवर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. 
ही क्रमवारी निश्चित करताना गुणात्मक व संख्यात्मक दर्जाचाही विचार केला गेला. 

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. राज्यातील सर्वात आदर्श अशी ही इमारत आहे. नुकतेच या कार्यालयाने आयएसओ मानांकनही प्राप्त केलेले आहे. बारामती, इंदापूर व दौंड अशा तीन तालुक्यांसाठी हे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयात दहा  अधिकारी व सोळा  कर्मचारी कार्यरत असून गतवर्षी या कार्यालयात 32674  वाहनांची नोंदणी झाली व या कार्यालयाने 84 कोटी   रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. 

सर्वांच्या सहकार्यानेच यश
सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी जे सहकार्य केले त्या मुळेच बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा क्रमांक राज्यात अव्वल आला आहे. सामूहिक प्रयत्नांचेच हे यश म्हणावे लागेल. भविष्यातही हीच गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- अनिल वळीव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती. 

गुणवत्ता सुधारणेचाही प्रयत्न
या पुढील काळात आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे, गुणवत्ता टिकविण्यासोबतच त्यात वाढ कशी करता येईल, याचा प्रयत्न आम्ही निश्चित करु, लोकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करु
- दत्तात्रय सांगोलकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com