
बारामती सायन्स अँड इनोव्हेशन अँक्टिव्हीटी सेंटरचे गुरुवारी उद्घाटन
माळेगाव : विद्यार्थ्यांमधील नवकल्पना विकसित करणे व त्यांच्यात संशोधनात्मक मानसिकता तयार करण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट,बारामती या संस्थेने सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरची नव्याने उभारणी केली. हा महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी राजीव गांधी सायन्स टेक्नाॅलाॅजी कमिशन (महाराष्ट्र शासन) आणि टाटा ट्रस्टने मोलाचे सहकार्य केले. त्यानुसार १६ जून रोजी वरील प्रकल्पाचे उद्धाटन आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या हस्ते आहे.
यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. या कार्य़क्रमाच्या निमित्ताने राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनाचेही आयोजन केल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, शारदानगर येथे आयोजित विज्ञान प्रदर्शन १५ ते १७ जून दरम्यानच्या कालावधीत घेण्यात येणार आहे.
मागिल ३ वर्षापासून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील इनस्पायर आवार्डसाठी निवड झालेले प्रकल्प, यावर्षी जिल्हा स्तरावर निवड झालेले प्रकल्प, कोठेही निवड न झालेले मात्र नवीन क्रिएटिव्ह माॅडेल तयार आहेत, अशा राज्यातील कोणत्याही शाळेतील सर्व प्रकारच्या माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते १२ वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनामध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी आणि इयत्ता ९वी ते १२ वी असे तीन गट करण्यात आले आहेत. आजवर अडीचशे पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यावेळी तज्ञ व्यक्तीचे फन सायन्स शो, जादूचे प्रय़ोग, विज्ञान कार्य़शाळा, स्टॅंड अप काॅमेडी अशा विविध कार्य़क्रमांची रेलचेल मुलांना पहावयास मिळणार आहे, अशी अशी माहिती ट्रस्टचे सीईओ निलेश नलावडे, सायन्स सेंटरच्या व्यवस्थापक हिना भाटीया यांनी दिली.
सायन्स सेंटरला नामांकित संस्थाचे सहकार्य़...!
अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट,बारामती या संस्थेने नव्याने उभारलेल्या सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरला राज्यात विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नामवंत संस्था आणि तज्ञांनी मार्गदर्शन केल आहे. त्यामध्ये प्रमुख्याने नेहरू सायन्स सेंटर (मुंबर्ई), होमी भाभा विज्ञान केंद्र (मुंबई), अगस्त्या इंटरनॅशनल-कुप्पम, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी (पुणे), कॅडमॅक्स-नाशिक आदी संस्थांचा समावेश आहे.
अधुनिक तंत्रज्ञान अनुभवास मिळणार...!
सायन्स सेंटरमध्ये उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चर गॅलरी, ३डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्चुअल रियालिटी, आॅगमेंटेड रियालिटी यासारखे तंत्रज्ञान पहायला व अनुभवायला मिळेल. जपान, कोरिया, चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरूण संशोधक अॅटोमोबाईल, टेलीकाॅम, होम अॅप्लायन्सेस या क्षेत्रात उत्तरोत्तर भरीव प्रगती करीत आहेत. याच विचारातून कोडींग, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, डिजाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण बारामती सायन्स सेंटरमध्ये मिळणार आहे.
Web Title: Baramati Science And Innovation Activity Center Inauguration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..